आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावकाराच्या वसुलीच्या तगाद्यामुळे पेटवून घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सावकाराच्या तगाद्याला कंटाळून पेटवून घेतलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजू बबन माकुडे (वय ४५, नगर) असे त्यांचे नाव आहे. आठ दिवसांपूर्वी त्यांनी पेटवून घेतले होते. रविवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. माकुडे यांचा मुलगा गणेशने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी विलास दत्तू ढवण (ढवणवस्ती) याच्याविरुद्ध आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा गुन्हा नोंदवला. 

नातेवाईकांकडून आणलेल्या टेम्पोद्वारे माकुडे कुटुंब भाजीविक्रीचा व्यवसाय करत होते. दोन वर्षांपूर्वी ढवण याच्याकडून राजू माकुडे यांनी दहा टक्के व्याजदराने लाख १० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, कौटुंबिक अडचणींमुळे त्यांना ते परत करणे शक्य झाले नाही. ढवण याने माकुडे यांच्याकडे तगादा लावला होता. २७ जानेवारीला घरात अंगावर पेट्रोल ओतून माकुडे यांनी स्वत:ला पेटवून घेतले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी त्यांचा मृत्यू झाला. 
 
बातम्या आणखी आहेत...