आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा प्रतिनिधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जिल्ह्यातील दोन तालुके वगळता जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. जिल्ह्यातील सात तालुके असे आहेत की, ज्यामध्ये 25 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस व पेरण्या झालेल्या आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली.
बैठकीत पाचपुते यांनी कुकडी व घोड प्रकल्पांतर्गत उभ्या पिकांसाठी किती पाण्याची गरज आहे, याचा आढावा घेऊन नियोजनाप्रमाणे पाणी सोडावे, अशी मागणी केली. पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाऊस व पेरण्या असतील अशा भागात केंद्र सरकारच्या निर्णयानुसार दुष्काळ जाहीर करावा, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने निधी द्यावा, जोपर्यंत पावसाची स्थिती सुधारत नाही तोपर्यंत लोकांच्या मागणीनुसार जनावरांच्या छावण्या एक महिन्यासाठी सुरू ठेवाव्यात, जनावरांसाठी भुसा व खाद्य उपलब्ध करून द्यावे, रोजगार हमी व शेततळ्याची कामे सुरू करावीत, साठवण तलावासाठी 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करावा, पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करावा, दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावेत, अशा मागण्या पाचपुते यांनी बैठकीत केल्या. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना व नागरिकांना दुष्काळी स्थितीत राज्य सरकार व प्रशासन वार्‍यावर सोडणार नाही. पाण्यावरून राजकारण न करता पाण्याचा प्रश्न सामंजस्याने सोडवावा, असे पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी सांगितले. सीनातून पाणी सोडणार सीना धरणातून पाणी सोडण्याबाबत मागणी करण्यात आली होती. त्यानुसार मंत्रीमंडळाच्या बैठकीत सीना धरणातून 75 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील पाणीप्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे.