आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरोड्याच्या तयारीत असणाऱ्यांना अटक; एक जण फरार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर- दुरगाव फाटा (ता. कर्जत) येथे दरोडयाच्या तयारीत असणाऱ्या काही जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी हर्षा याद्या भोसले, मालशा याद्या भोसले, गंगाराम ऊर्फ गुंग्या लाला भोसले (रा. बाभळगाव, ता. कर्जत), आकाश्या पैजंण्या काळे (रा. पिपंळवाडी, ता. कर्जत), नितीन मुरलीधर थेटे (रा. डिकसळ, ता. कर्जत) या सर्वांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक गज, दोन चाकू, दोरी, लाल मिरची पावडर, काळे स्कार्फ, लाकडी दाडंके, दोन बॅटरी हे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
 
एक जण आहे फरार
 
याप्रकरणी कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी नंदश्या बंदर्या काळे (रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड) हा फरार झाला आहे. हे सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
बातम्या आणखी आहेत...