आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बनवाबनवी: कर्णबधिर रुग्णांची शिर्डीत पिळवणूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी: साईबाबा संस्थानातील उच्चपदस्थांना हाताशी धरून डॉ. नानासाहेब होन ‘प्रेशर पॉइंट थेरपी’ यंत्राद्वारे कर्णबधिर रुग्णांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याचा आरोप माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते संजय काळे यांनी केला आहे.
साई संस्थानमध्ये कर्णबधिर रुग्णांवर उपचार करण्यासाठी अधिकृत यंत्रणा उपलब्ध असताना डॉ. होन यांना फायदा करून देण्यामागे कोणत्या उच्चपदस्थांचा हात आहे? याची चौकशी करावी, अशी मागणी काळे यांनी साईबाबा संस्थानचे कार्यकारी यांना पत्र पाठवून केली आहे.
पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकार अथवा मेडिकल कौन्सिल यांनी अद्याप डॉ. होन यांना मान्यता दिलेली नाही, तरीही डॉ. होन प्रेशर पॉइंट थेरपी उपचार पद्धतीचा थेट अवलंब करीत आहेत. मार्चमध्ये साईबाबा संस्थानच्या साईबाबा रुग्णालयात होन यांचे दोन दिवसांचे उपचार शिबिर पार पडले.
या शिबिरात त्यांनी दोन दिवसांत तब्बल 165 रुग्णांवर प्रेशर पॉइंट थेरपीद्वारे उपचार करून तीन लाख रुपये खिशात घातले. विशेष म्हणजे संस्थानच्याच साईनाथ रुग्णालयात हेच उपचार अवघे शंभर रुपयांत उपलब्ध असताना डॉ. होन यांचे शिबिर आयोजित करण्याचे कारण काय, असा सवाल काळे यांनी या पत्रात केला आहे. हा प्रकार साईबाबा संस्थानच्या अधिकार्‍यांनी तातडीने रोखावा, अशी मागणी काळे यांनी केली आहे.