आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला परत आणण्यासाठी शेगावात पती चढला टॉवरवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेगाव - प्रियकरासोबत निघून गेलेल्या पत्नीचा शोध घेऊन तिला परत आणून द्यावे, या मागणीसाठी शहरातील जोगडी फैलमधील दीपक देशमुख या युवकाने शुक्रवारी मोबाइल टॉवरवर चढून ‘शोले’स्टाइल वीरुगिरी केली. पत्नी मुलाला घेऊन प्रियकरासोबत निघून गेली, अशी तक्रार दीपकने पोलिस ठाण्यात केली होती. मात्र, पोलिस कारवाई करीत नसल्याचा आरोप करत त्याने पोलिस ठाण्याच्या बाजूला असलेल्या मोबाइल टॉवरवर चढून हे नाटक केले. दरम्यान, संशयित प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पुणे येथील त्याच्या घराची झडतीही घेतली होती. मात्र, दीपकची पत्नी तिथे न आढळल्याने त्याला सोडून दिले, अशी माहिती ठाणेदार सुभाष पुसांडे यांनी दिली. या प्रकरणाचा पोलिस तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.