आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepali Sayyad News In Marathi, AAP, Nagar South Lok Sabha Seat

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दीपाली सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - आम आदमी पक्षाच्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार दीपाली सय्यद यांच्यासह 20 ते 22 जणांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.सय्यद व त्यांच्यासोबत असेलल्या जमावाने शनिवारी दुपारी कार्यकारी दंडाधिकार्‍यांची परवानगी न घेता वाडिया पार्क परिसरातील महात्मा गांधी व बसस्थानक परिसरातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रचारफेरी काढली. याप्रकरणी सय्यद यांच्यासह अँड. जावेद काझी, अँड. शिल्पा रजपूत, राजेंद्र कर्डिले, प्रशांत वाघस्कर, दिलीप घुले, संपत मोटे व इतर 10 ते 15 जणांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. गोपनीय शाखेचे कर्मचारी विकास खंडागळे यांनी तशी फिर्याद दिली आहे. अधिक तपास हवालदार संजय पवार करीत आहेत.