आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Assembly Election 2015: BJP Defeat Means Modi, Not Blame On Bedi Hazare

भाजपचा पराभव हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच, बेदींना दोष नको - अण्‍णा हजारे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर - दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपचा पराभव हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच आहे. आपचे संयोजक अरविंद केजरीवाल हे हुशार व अनुभवी असल्याने ते चांगले सरकार चालवतील, अशी अपेक्षा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. पुन्हा राजीनामा देण्याची चूक करू नये, असा सल्ला केजरीवाल यांना देतानाच या पराभवाला किरण बेदी यांना जबाबदार धरू नये, असे अण्णा म्हणाले.

राळेगणसिद्धी येथे मंगळवारी माध्यमांशी बोलताना अण्णा म्हणाले, केंद्र सरकारने गेल्या नऊ महिन्यांत काहीच केले नाही. ही सुरुवात आहे. अशीच भूमिका राहिली, तर गल्लीपर्यंत भाजपची विश्वासार्हता कमी होईल. मोदींनी सहा सभा घेऊनही दारुण पराभव झाला आहे. अण्णा पुढे म्हणाले, केजरीवाल हुशार व अनुभवी आहेत. त्यांना कोणताच स्वार्थ नाही. देश व राष्ट्रहिताचा दृष्टिकोन असल्याने ते चांगले सरकार चालवतील.

शपथविधीला जाणार नाही
शपथविधी समारंभ कसा करायचा हा केजरीवाल यांचा प्रश्न आहे. मात्र, देशाची परिस्थिती बिकट असल्याने कोणतेही प्रदर्शन न करता साधेपणाने करावा. त्यामुळे जनतेत सरकारविषयी आपुलकी निर्माण होईल. शपथविधी सोहळ्याला जाणार नसल्याचे अण्णांनी स्पष्ट केले.