आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुलासाठी तृतीय पंथियांचे मनपा प्रशासनाला साकडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - घरकुलापासून वंचित असलेल्या तृतीयपंथीयांचे पंतप्रधान आवास योजनेतून घर देण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिल्यानंतर सोमवारी महापालिका प्रशासनाने तृतीयपंथीयांचे घरकुलांचे अर्ज स्वीकारले आहेत. दरम्यान, पाच दिवसांत कागदपत्रे सादर करण्याची मुदत महापालिका प्रशासनाने तृतीयपंथीयांना देण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेचे प्रकल्प अधिकारी आर.जी. मेहेत्रे यांनी तातडीने दखल घेत तृतीयपंथीयांचे अर्ज स्वीकारले. उपायुक्त चारठाणकर यांनी घरकुल वंचित असलेल्या सर्व भारतीयांसाठी पंतप्रधान आवास योजना असल्याचे स्पष्ट करून, तृतीयपंथीय यापासून वंचित राहू नये यासाठी सूचना केल्या.

उपायुक्त अजय चारठाणकर म्हणाले, तृतीयपंथीयांना आधार कार्ड काढून जनधन खाते उघडण्याचे सांगितले. शहरात सुमारे २०० तृतीयपंथीय असून त्यांना स्वत:चे घर नसल्याने या योजनेच्या माध्यमातून त्यांना घर उपलब्ध होणार असल्याचे तृतीय पंथीयांचे जिल्हाध्यक्ष काजल गुरु यांनी सांगितले. आर.जी. मेहेत्रे यांनी तृतीयपंथीयांना गटाच्या अर्जाच्या नमुण्याची माहिती दिली. यावेळी तृतीयपंथीय समाजाचे जिल्हाध्यक्ष काजल गुरू, लैला, रिटा, संध्या, प्रीती, मुस्कान, शीला, कल्याणी, वर्षा आदींसह शहरातील तृतीयपंथीय उपस्थित होते.

पंतप्रधान आवास योजनेचे अर्ज नाकारण्यात आल्याने तृतीयपंथीयांनी उपायुक्त अजय चारठाणकर यांच्याकडे अर्ज सुपूर्द केले. या वेळी तृतीयपंथीय समाजाचे जिल्हाध्यक्ष काजल गुरू, लैला, रिटा, संध्या, प्रीती, मुस्कान, शीला, कल्याणी, वर्षा आदी उपस्थ्ति होते.
बातम्या आणखी आहेत...