आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 साखर कारखान्यांचे प्रतिनिधी बैठकीस अनुपस्थित, 2 दिवसांत तोडगा काढण्याची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर - शेतकरी संघटनांनी ऊसदराबाबत सुरू केलेल्या आंदोलनाला शेवगाव येथे हिंसक वळण लागल्याने प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी साखर कारखाने शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मात्र, या बैठकीला कारखान्यांचे पदाधिकारी उपस्थित राहल्याने शेतकरी नेत्यांनी संताप व्यक्त करून दोन दिवसांत तोडगा काढण्याचा निर्वाणीचा इशारा दिला.

 

या बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल शेळके, तालुकाध्यक्ष चंद्रकांत उंडे, जितेंद्र भोसले, सुरेश ताके, दिलीप गलांडे, शिवाजी जवरे, अमोल मोडे, बाळासाहेब डौले, रवींद्र मोरे उपस्थित होते. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोटतिडकीने आपल्या भावना व्यक्त केल्या. शेळके म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने उसाला चांगला भाव देऊ शकतात. मग नगर जिल्ह्यातील साखर कारखानदारांना हे का शक्य होत नाही? आमचे आंदोलन शांततेच्या मार्गाने चालू आहे. दोन दिवसांत दराबाबत निर्णय झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला.

 

ताके म्हणाले, कारखानदार ऊसक्षेत्र लागवडीची चुकीची माहिती देतात. साखर उतारा कमी दाखवून उसाला कमी दर देतात. अशोक कारखान्याचा सर्व हिशेब केला, तर हा कारखाना ३२०० रूपयांपर्यंत भाव देऊ शकतो. साखरेचे उत्पन्न कमी दाखवून ऊस उत्पादकांची फसवणूक करतात. शेतकऱ्यांना लुटण्याचे काम साखर कारखानदार करत आहेत. भोसले यांनी सर्व कारखान्यांनी ११.३० साखर उतारा काढण्याची मागणी केली. शिवाजी जवरे यांनी पोलिसांनी केलेल्या गोळीबाराचा निषेध केला.

 

श्रीरामपूरमधील अशोक साखर कारखाना, राहुरीतील प्रसाद शुगर डॉ. बाबुराव तनपुरे साखर कारखाना या तिन्हींचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित नव्हते. तनपुरे कारखान्याच्या गाळपास अद्याप परवानगी मिळालेली नाही. प्रसाद शुगरच्या प्रतिनिधींनी दूरध्वनीवरून शेतकऱ्यांसोबत असल्याचे कळवले.

बातम्या आणखी आहेत...