आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे ते शिर्डी इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर रेल्वे स्थानकावरून पुणे येथे जाण्यासाठी दौंड जंक्शन येथे रेल्वे इंजिनची दिशा बदलावी लागते. ही दिशा बदलण्यासाठी तास लागतो. त्यामुळे पुणे येथे जाण्यासाठी एक ते दीड तासांचा विलंब होतो. पण भीमा नदीच्या पुलावरून २०० मीटरची कार्डलाइन टाकल्यास नगर ते पुणे दरम्यानचा प्रवास दीड ते दोन तासात पूर्ण होईल, या मार्गावरून पुणे-नगर-शिर्डी अशी इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेने स्टेशन प्रबंधक यू. पी. पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. इंटरसिटी एक्स्प्रेसचा फायदा शिर्डी येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना होईल. या वेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख संभाजी कदम, विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, नगरसेवक विक्रम राठोड, डॉ. सागर बोरुडे, प्रकाश भागानगरे, अशोक दहिफळे उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...