आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थोर नेत्यांचे पुतळे अन्‌ युद्ध स्मारक फ्लेक्सने झाकोळले, फलक लावणाऱ्यांवर कारवाई कधी?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- थोर समाजसेवक महात्मा फुले असो, की भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, त्यांना झाकोळून टाकण्याचा पराक्रम नगरमधील फ्लेक्सबहाद्दर पुढारी आणि त्यांचे टिनपाट कार्यकर्ते सध्या करत आहेत. १८०३ मध्ये मराठा-इंग्रज लढाईत नगरच्या शूर सैनिकांनी गाजवलेल्या पराक्रमाचे स्मारक असलेली माळीवाड्यातील शीळाही फ्लेक्सने झाकण्यात आली आहे. 
 
५२७ वर्षांचा इतिहास असलेल्या अहमदनगर शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. यातील काही वास्तू तर देशाच्याच नव्हे, तर जागतिक इतिहासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. तथापि, फ्लेक्सछाप पुढाऱ्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची विटंबना चालवली आहे. शहरातील बहुतेक सर्व ऐतिहासिक वास्तू राष्ट्रीय नेत्यांच्या पुतळ्यांभोवती सध्या फ्लेक्सफलक लागले आहेत. 
 
बाजार समितीच्या प्रवेशद्वारातील पंडित नेहरूंचा पुतळा आणि माळीवाडा वेशीतील महात्मा फुले यांचा पुतळा तर फ्लेक्समुळे अनेकदा दिसतच नाही. तीच गोष्ट लालटाकीवरील नेहरूंच्या पूर्णाकृती पुतळ्याची. या पुतळ्यासमोर उर्वरितपान वर 
 
आधी लायकी तपासा 
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबरीने आपली छबी फ्लेक्सवर झळकावणाऱ्यांनी आत्मपरिक्षण करावे. या महापुरूषांशी बरोबरी करण्याची लायकी आहे का, हे तपासावे. असे फ्लेस लावणे बंद झाले पाहिजे.'' 
- प्रमोद कांबळे, शिल्पकार. 
 
इतिहासाची विटंबना 
ऐतिहासिक वास्तू हे नगर शहराचे वैभव आहे. हे वैभव जपण्याचा प्रयत्न आम्ही करत असताना काही जण फ्लेक्स लावून शहराची आणि ऐतिहासिक वास्तूंची विटंबना करत आहेत. याविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे. 
- जयंत येलूलकर, अध्यक्ष, रसिक ग्रूप