आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागण्यांवर लवकरच कार्यवाही होणार, आयुक्तांचे कामगार पदाधिकाऱ्यांना आश्वासन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर; महापालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त विलास ढगे यांनी बुधवारी दिले. कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी हे आश्वासन दिले असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस आनंद वायकर यांनी दिली.
महापालिकेतील पात्र कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती लागू करणे, बढती देणे, सहाव्या वेतन आयोगाचा फरक, तसेच थकीत महागाई भत्त्याचा फरक देणे, वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती अंतर्गतची थकीत बिले देणे आदी प्रलंबित प्रश्नांबाबत आयुक्त ढगे यांनी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी उपायुक्त अजय चारठाणकर, भालचंद्र बेहेरे, सहायक आयुक्त अशोक साबळे, अास्थापना प्रमुख अंबादास सोनवणे, संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे, उपाध्यक्ष अयुब शेख, विजय बोधे आदी उपस्थित होते. पदोन्नतीबाबत कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही. सर्व कायम सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाचा थकीत हप्ता महागाई भत्त्याचा थकीत फरक देण्यात येईल. वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती अंतर्गत कर्मचाऱ्यांची थकीत बिले येत्या १५ दिवसांत देण्याची कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासनही आयुक्तांनी दिले. आरोग्य विभागातील कचरा संकलन वाहतूक कामातील सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी सणासाठी प्रत्येकी पंधरा हजार रुपये सानुग्रह अनुदान सण अग्रीमची रक्कम सणापूर्वीच देण्याची मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली असल्याचे वायकर यांनी सांगितले.

आंदोलनाची परंपरा कायम राहणार ?
महापालिकाकर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान सणअग्रीमसाठी दरवर्षी आंदोलन करावे लागते. त्याशिवाय त्यांना हे अनुदान मिळत नाही. दिवाळी सण आला की मनपा कर्मचाऱ्यांचे आंदोलन ठरलेलेच असते. यंदा दिवाळी सणासाठी संघटनेने पंधरा हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदानाची मागणी केली आहे. मागणी पूर्ण झाल्यास संघटनेवर पुन्हा एकदा आंदोलन करण्याची वेळ येणार आहे. त्यांची आंदोलनाची ही परंपरा यावर्षी कायम राहणार का, हे वेळ आल्यावरच स्पष्ट होईल.

पदोन्नतीबाबत चर्चा
मनपात१२ १४ वर्षे सेवा केलेल्या ५० वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती लागू करणे, यावर बैठकीत चर्चा झाली. या मागण्यांच्या प्रस्तावांची संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह पडताळणी करण्यात येणार आहे, असे आश्वासन अायुक्त ढगे यांनी दिले.