आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथारी व्यावसायिकांची मनपासमोर निदर्शने, पथविक्री नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- उपजीविकेचे संरक्षण व पथविक्री नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी केल्यानंतरच शहरातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण काढावे, या मागणीसाठी पथारी व्यावसायिक पंचायतच्या जिल्हा शाखेतर्फे महापालिका कार्यालयासमोर बुधवारी निदर्शने करण्यात आली.
महापालिकेने गेल्या महिनाभरापासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. त्यात अनेक फेरीवाले व हातगाड्यांचे अतिक्रमण काढण्यात आले. त्यामुळे फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मनपा प्रशासनाने अगोदर उपजीविकेचे संरक्षण व पथविक्री नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी करावी, त्यानंतरच फेरीवाल्यांचे अतिक्रमण काढावे, अशी मागणी पंचायततर्फे करण्यात आली. पंचायतचे जिल्हाप्रमुख शंकरराव घुले यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. यावेळी बाबा आरगडे, नंदू डहाणे, शहर हॉकर्स संघाचे शाकीर शेख, फारुक रंगरेज, चितळे रोड हातगाडीवाले व फेरीवाला संघटनेचे संजय झिंजे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उबेद शेख आदींसह पथारी व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.