आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विडी कामगारांची निदर्शने, आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कामगारांना मजुरी देण्यासाठी विडी कारखानदारांना बँकेतून रक्कम उपलब्ध करुन द्यावी, या मागणीसाठी राज्य विडी कामगार फेडरेशन, लालबावटा विडी कामगार युनियन नगर विडी कामगार संघटनेच्या वतीने बुधवारी चांदणी चौकातील स्टेट बँकेसमाेर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात महिला विडी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. 

माजी आमदार दादा कळमकर, कारभारी उगले, शंकर न्यालपेल्ली, शंकरराव मंगलारप, सुधीर टोकेकर, नाना आरगडे, व्यंकटेश बोगा, चंद्रकांत मुनगेल, बुचम्मा श्रीमल, शारद लगड, निर्मला न्यालपेल्ली, कमल गेंट्याल, सरोजना दिंकोडा, लीला भारताल, सुमित्रा जिंदम, शोभा कोडम, श्यामला म्याकल, शोभा पासकंटी, कमलाबाई दोंता, बालमणी म्याना आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. 

स्टेट बँकेच्या व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, विडी कामगारांना साप्ताहिक मजुरी दिली जाते. तथापि, विडी कारखानदारांना बँकेतून आठवड्याला केवळ ५० हजार रुपये मिळतात. त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबर महिन्याची मजुरी कामगारांना मिळालेली नाही. त्यामुळे विडी कामगार अडचणीत आले अाहेत. बँकेने तातडीने विडी कारखानदारांना रक्कम उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.