आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवळाली प्रवरात डेंग्यूचे 4 रुग्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवळाली प्रवरा - हवामानात झालेला बदल व दूषित पाणी पुरवठय़ामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. देवळाली प्रवरा येथे डेंग्यूचे 4 संशयित रुग्ण आढळले आहेत. साथीच्या अन्य आजारांमुळे शहरातील शासकीय रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढते आहे.

देवळाली प्रवरासह अन्य भागात 1 जूनपासून पावसाला प्रारंभ झाला. पावसाचा जोर सध्या कमी असला, तरी वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे तसेच हवामानातील बदलांमुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे.

ठिकठिकाणी साचलेल्या पावसाच्या पाण्याच्या डबक्यांमुळे डासांचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. डास निर्मूलनाबाबत नगरपरिषदेने उशिरा उपाययोजना हाती घेतल्या आहेत. अशुद्ध पाण्यामुळे होणार्‍या व्याधींची त्यात भर पडली आहे. मागील काही दिवसांपासून देवळाळी भागात गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने अनेकांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला आहे. याशिवाय डेंग्यू, मलेरिया, कावीळ व तापाचे रुग्ण वाढले आहेत. देवळाली प्रवरा येथील राहुरी कारखाना भागातील प्रसादनगर येथे डेंग्यूचे 3 रुग्ण आढळले आहेत, तर कराळेवाडी येथे एका महिलेला डेंग्यूची लागण झाली आहे. डेंग्यूच्या 4 रुग्णांपैकी 2 जणांवर नगर येथे, तर अन्य दोन जणांवर र्शीरामपूर येथे उपचार सुरू आहेत.