आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूने घेतला चिमुकलीचा बळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - स्टेशनराेड परिसरातील हर्षा फेवर या आठ महिन्यांच्या मुलीचा डेंग्यूने बळी घेतला. खासगी रुग्णालयातील "रॅपिड एनएस वन' चाचणीनुसार हर्षाचा मृत्यू डेंग्यूने झाल्याचे स्पष्ट झाले. परंतु सरकारी यंत्रणा तिचा मृत्यू डेंग्यूने झाल्याचे मान्य करण्यास तयार नाही. "एलायझा' चाचणीचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे सरकारी यंत्रणेचे म्हणणे आहे.दरम्यान, शहरात आणखी ४० डेंग्यूसदृश रुग्ण असून सरकारी खासगी चाचण्यांमुळे त्यांचा गोंधळ उडाला आहे.

सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहराच्या विविध भागात डेंग्यूसदृश ४० रुग्ण आढळून आले आहेत. केडगाव, तारकपूर, दिल्ली दरवाजा, स्टेशन रोड आदी भागात असे रुग्ण आढळले आहेत. स्टेश्न रोड परिसरात हर्षा फेवर या आठ महिन्यांच्या मुलीचा चार दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयात डेंग्यूने मृत्यू झाला. खासगी रुग्णालयाच्या रॅपिड एनएस वन चाचणीनुसार हर्षाचा मृत्यू डेंग्यूनेच झाल्याचे स्पष्ट झाले. सरकारी यंत्रणेने तिच्या रक्ताचे नमुने एलायझा चाचणीसाठी पाठवले आहेत. या चाचणीचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. खासगी रुग्णालयातील रॅपिड चाचणीचा अहवाल सरकारी यंत्रणा ग्राह्य धरत नाही. त्यामुळे डेंग्यूसदृश रुग्णांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात सध्या डेंग्यूसदृश ४० रुग्ण आहेत. त्यापैकी ३५ रुग्णांची एलायझा करण्यात आली असून त्यात डेंग्यूची लागण झाली नसल्याचे सरकारी यंत्रणेचे म्हणणे आहे.

डेंग्यू कावीळ नगरकरांचा पिच्छा सोडायला तयार नाही. प्रशासन, पदाधिकारी नगरसेवक नेहमीप्रमाणे स्थिती हाताबाहेर गेल्यानंतर जागे होतात. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. मनपाचा आरोग्य विभाग जिल्हा हिवताप विभागामार्फत रक्ताचे नमुने घेऊन ते शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात. ज्या भागात संशयित रुग्ण आढळून आले, त्या भागात धूर फवारणी करण्यात येते, असा मनपाचा दावा आहे.
स्टेशनराेड परिसरातील हर्षा फेवर या आठ महिन्यांच्या मुलीचा डेंग्यूने बळी घेतला. खासगी रुग्णालयातील "रॅपिड एनएस वन' चाचणीनुसार हर्षाचा मृत्यू डेंग्यूने झाल्याचे स्पष्ट झाले. परंतु सरकारी यंत्रणा तिचा मृत्यू डेंग्यूने झाल्याचे मान्य करण्यास तयार नाही. "एलायझा' चाचणीचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे सरकारी यंत्रणेचे म्हणणे आहे.दरम्यान, शहरात आणखी ४० डेंग्यूसदृश रुग्ण असून सरकारी खासगी चाचण्यांमुळे त्यांचा गोंधळ उडाला आहे.

सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहराच्या विविध भागात डेंग्यूसदृश ४० रुग्ण आढळून आले आहेत. केडगाव, तारकपूर, दिल्ली दरवाजा, स्टेशन रोड आदी भागात असे रुग्ण आढळले आहेत. स्टेश्न रोड परिसरात हर्षा फेवर या आठ महिन्यांच्या मुलीचा चार दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयात डेंग्यूने मृत्यू झाला. खासगी रुग्णालयाच्या रॅपिड एनएस वन चाचणीनुसार हर्षाचा मृत्यू डेंग्यूनेच झाल्याचे स्पष्ट झाले. सरकारी यंत्रणेने तिच्या रक्ताचे नमुने एलायझा चाचणीसाठी पाठवले आहेत. या चाचणीचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. खासगी रुग्णालयातील रॅपिड चाचणीचा अहवाल सरकारी यंत्रणा ग्राह्य धरत नाही. त्यामुळे डेंग्यूसदृश रुग्णांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात सध्या डेंग्यूसदृश ४० रुग्ण आहेत. त्यापैकी ३५ रुग्णांची एलायझा करण्यात आली असून त्यात डेंग्यूची लागण झाली नसल्याचे सरकारी यंत्रणेचे म्हणणे आहे.

डेंग्यू कावीळ नगरकरांचा पिच्छा सोडायला तयार नाही. प्रशासन, पदाधिकारी नगरसेवक नेहमीप्रमाणे स्थिती हाताबाहेर गेल्यानंतर जागे होतात. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. मनपाचा आरोग्य विभाग जिल्हा हिवताप विभागामार्फत रक्ताचे नमुने घेऊन ते शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात. ज्या भागात संशयित रुग्ण आढळून आले, त्या भागात धूर फवारणी करण्यात येते, असा मनपाचा दावा आहे.

अशी घ्या काळजी
एडीसनावाचा डास चावल्याने होतो डेंग्यू
एडीस डास दिवसा चावतो
स्वच्छ साठलेल्या पाण्यात आढळतो एडीस
घर परिसर नेहमी स्वच्छ ठेवा
आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळा
पाण्याचे साठे पूर्णपणे कोरडे करा
सांडपाणी उघड्यावर सोडू नका
निरुपयोगी वस्तू परिसरात ठेवू नका
खिडक्यांना जाळ्या बसवा
मच्छरदाणी डास प्रतिबंधक औषधे वापरा

धूर फवारणी सुरू
डेंग्यूसदृशरुग्ण आढळल्याने मनपाच्या वतीने उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. विविध भागात धूर फवारणी सुरू आहे. जनजागृती मोहीमही हाती घेण्यात येणार आहे. नागरिकांनी स्वत:चे घर परिसरात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. अाठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे आवश्यक आहे. डेंग्यूच्या रुग्णांची तातडीने माहिती देण्याच्या सूचना खासगी रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.'' सतीशराजूरकर, आरोग्याधिकारी
बातम्या आणखी आहेत...