आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजारांचे मूळ मानसिक स्थितीवर अवलंबून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- एकदिवसाच्या बालकापासून ते अंतिम क्षणापर्यंत प्रत्येकाला चांगले आरोग्य हवे असते. मात्र, ते राखण्यासाठीचे आवश्यक ज्ञान घेता चुकीच्या जीवनशैलीमुळे विविध आजारांना स्वत: निमंत्रण देऊन नंतर त्यावर उपचार करण्यासाठी वेळ पैसा वाया घातला जातो. विविध आरोग्य चाचण्या करून औषधे घेऊनही आजार का वाढतात, यावर संशोधन केले असता आजारांचे मूळ कारण मानसिक स्थितीवर अवलंबून असते, असे मत डॉ. पी. एन. कदम यांनी व्यक्त केले.
पी. एम. मुनोत ट्रस्ट आयोजित "डॉक्टर तुमच्या भेटीला' उपक्रमांतर्गत पुण्याचे कौन्सेलिंग तज्ज्ञ डॉ. कदम यांचे "मनापासून आजार कसे बरे कराल' या विषयावर व्याख्यान झाले. अॅड. शरद पल्लोड यांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले. यावेळी चेतन गांधी, रमणलाल मेहेर, शरद मुनोत, आदेश चंगेडिया अादी उपस्थित होते.

डॉ. कदम म्हणले, ६५ टक्के आजार हे मानसिक शारीरिक असंतुलनातून होतात. मन शरीराचा परस्परांशी संबंध लक्षात घेता केवळ औषधोपचार करून आजार बरे होणार नाहीत, तर त्यासाठी स्वत:ची जीवनशैली समजून घेतली पाहिजे. प्राणी नैैसर्गिक आयुष्य जगतात. प्राण्यांना कधी इन्शुलन्स घ्यावे लागत नाही. त्यांना अतिगुडघे दु:खी झाल्याचे ऐकिवात नाही. कारण ते त्यांचे आयुष्य नैसर्गिक पद्धतीने जगतात.

उत्तम निरोगी आयुष्य जगण्यासाठी आहार, विहार विचार या तीन सूत्रांची गरज ओळखून जीवनशैली बदलली पाहिजे. शरीरातील विभागणीचा वेग जेवढा जास्त तेवढे आयुष्य कमी होते. या पेशींचा वेग कमी होण्यासाठी काय हवे, हे कळले की शरीर निरोगी ठेवता येते. त्यासाठी शुद्ध हवा, पाणी, सकस आहार, व्यायाम मानसिकता याकडे लक्ष दिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
पी. एम. मुनोत ट्रस्ट आयोजित "डॉक्टर तुमच्या भेटीला' कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करताना अॅड. शरद पल्लोड. समवेत डॉ. पी. एन. कदम अन्य मान्यवर.
बातम्या आणखी आहेत...