आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deputy Commissioner Balachandra Behera, Latest News In Divay Marathi

मनपा उपायुक्तपदी भालचंद्र बेहेरे रुजू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-वर्षभरापासून रिक्त असलेल्या महापालिकेच्या उपायुक्तपदी (कर) जळगाव महापालिकेचे उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांची नेमणूक झाली. त्यांनी बुधवारी पदभार स्वीकारला असून आयुक्त विजय कुलकर्णी यांनी त्यांच्याकडे कर, आरोग्य, वाहन व्यवस्था, सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना आदी विभागांचा कार्यभार सोपवला आहे.
उपायुक्त स्मिता झगडे यांच्या बदलीनंतर हे पद रिक्त होते. त्यामुळे मनपाच्या कामकाजावरही परिणाम झाला होता. नगररचना अधिकारी विश्वनाथ दहे यांची काही दिवसांपूर्वीच प्रभारी नेमणूक करण्यात आली होती. महापौर संग्राम जगताप यांनी चार दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे उपायुक्तपद तातडीने भरण्याची मागणी केली होती. त्यानंतर बुधवारी बेहेरे यांनी पदभार घेतला.
बेहेरे हे जून 2011 ते ऑगस्ट 2013 या कालावधीत जळगाव महापालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी तळोदा, सावदा, सासवड, नांदुरा, अंमळनेर व देवळाली प्रवरा नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून काम केले. पदभार घेतल्यानंतर आयुक्त विजय कुलकर्णी यांनी त्यांच्याकडे कर, आरोग्य, सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना आदी महत्त्वाच्या विभागांचा कार्यभार सोपवला.