आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deputy Mayor Geetanjali Kale Give Threatens To Municipal Commissioner

...तर रस्त्यावरील माती आयुक्तांच्या बंगल्यापुढे टाकू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- यश पॅलेस हॉटेल ते सीना नदी दरम्यान सुरू असलेले ड्रेनेजलाइनचे काम अनेक दिवसांपासून अर्धवट अवस्थेत आहे. या कामासाठी खोदलेली माती पावसामुळे दगडी पुलाच्या रस्त्यावर आली असून त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. याबाबत तातडीने कार्यवाही झाली नाही, तर ही माती आयुक्तांच्या बंगल्यासमोर टाकण्यात येईल, असा इशारा उपमहापौर गीतांजली काळे यांनी आयुक्त विजय कुलकर्णी यांना निवेदनाद्वारे दिला.

दगडी पुलाजवळील रस्त्यावर आलेली माती तातडीने उचलण्याबाबत संबंधित अधिकार्‍यांना अनेकवेळा सांगितले, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मातीमुळे दगडी पूल रस्त्याचे नवीन डांबरीकरण खराब झाले आहे. केडगाव देवी मंदिर व रेल्वे स्टेशनकडे जाणार्‍यांची या रस्त्यावर वर्दळ असते. आनंदऋषी रस्त्यावरील ड्रेनेजलाइन टाकण्याचे काम अर्धवट असतानाही ठेकेदाराला 34 लाखांचे बिल देण्यात आले आहे. परिसरातील हॉटेल व्यावसायिक या रस्त्यावर कचरा टाकतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांकडे याबाबत तक्रार करूनही कार्यवाही झाली नाही. रस्त्यावरील मातीचा पावसामुळे चिखल झाला आहे. त्यामुळे अनेक लहान-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे दगडी पूल रस्त्यावरील माती व कचरा उचलण्याची कार्यवाही तातडीने करावी; अन्यथा सर्व माती आयुक्तांच्या बंगल्यासमोर टाकण्यात येईल, असा इशारा काळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.