आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉर्ड विकासनिधीच्या 100 टक्के खर्चास मंजुरी; महापौर शिंदे यांची माहिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - सन 2013-14 साठी महापालिकेने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकीय तरतुदींच्या अंमलबजावणीस मंगळवारपासून सुरुवात झाली. महापौर, उपमहापौर, स्थायी सभापती, तसेच महिला बालकल्याण समितीच्या सभापती, उपसभापतींचा 75 टक्के शहर विकासनिधी आणि 100 टक्के वॉर्ड विकासनिधीच्या खर्चास आयुक्त विजय कुलकर्णी यांनी मान्यता दिली आहे, अशी माहिती महापौर शीला शिंदे यांनी दिली.

प्रशासनाने अंदाजपत्रकाची अंमलबजावणी सुरू न केल्यामुळे अनेक कामे रखडली होती. मनपा निवडणूक जवळ आली आहे. निवडणूक आचारसंहितेपूर्वी कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी नगरसेवकांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी अंदाजपत्रकीय तरतुदींची अंमलबजावणी करण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. यासंदर्भात आयुक्तांशी झालेल्या चर्चेनुसार अंदाजपत्रकाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे महापौरांनी सांगितले.

आयुक्तांनी पदाधिकार्‍यांच्या 75 टक्के शहरविकास निधी व नगरसेवकांच्या 100 टक्के वॉर्डविकास निधीस मंजुरी दिली. त्याचबरोबर विविध विभागांच्या वतीने करण्यात येणार्‍या विकासकामांच्या लेखाशिर्षातील तरतुदींपैकी 50 टक्के निधी वापरण्यात यावा व 50 टक्के निधी ऑक्टोबर 2013 अखेरपर्यंत राखीव ठेवण्यात यावा, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या असल्याचे महापौरांनी सांगितले.