आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन यादी तयार करण्यास मुहूर्त मिळेना; दलित वस्त्यांची 15 कोटींची विकासका मे मंजुरीच्या प्रतीक्षेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर; अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेंतर्गत मंजूर केलेल्या 15 कोटींच्या कामांना स्थायी समितीने शुक्रवारी (25 जुलै) स्थगिती दिली. यासंदर्भात अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी पुन्हा एक बैठक घेऊन आराखड्यातील त्रुटी दूर करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेत. आठ दिवस उलटूनही या बैठकीला मुहूर्त मिळाला नाही. स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या सभेत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या दलित वस्तीच्या विकास योजनेच्या विषयावर वादळी चर्चा झाली.
नियम डावलून 15 कोटींच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. एकाच दलित वस्तीला नाव बदलून दुबार लाभ देण्याचा प्रकारही या सभेत सदस्यांनी उघडकीस आणला होता. निवड समितीने कोणतीही शहानिशा न करता कामांना मान्यता दिल्याचा आरोपही सदस्यांनी केला. त्यामुळे लंघे यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन 15 कोटींच्या कामांना स्थगिती दिली.यासंदर्भात बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले होते. तथापि प्रशासन व पदाधिका-यांमध्ये ताळमेळ नसल्याने या बैठकीला अद्यापि मुहूर्त लागलेला नाही. ऑगस्ट महिन्याच्या तिस-या आठवड्यानंतर विधानसभेची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकास कामांसंदर्भात बैठक घेऊन निर्णय न घेतल्यास आचारसंहितेच्या कचाट्यात हा विषय प्रलंबित राहण्याची शक्यता आहे.
यादीत फेरबदल होणार
तालुक्यातील लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार निधी वाटप होणे अपेक्षित होते. तथापि तसे झाले नाही. त्यामुळे या कामांना स्थायी समितीने स्थगिती दिली. यासंदर्भात सोमवारी (4 ऑगस्ट) बैठक होण्याची शक्यता आहे. त्यात जुन्या यादीतील त्रुटी दूर करून काही फेरबदल होऊ शकतात.’’
शाहूराव घुटे, सभापती, समाजकल्याण.