आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Devendra Phadanavis Latest News In Divya Marathi

भाजप सत्तेवर आल्यास एलबीटी हद्दपार करू- देवेंद्र फडणवीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला राज्यात पूर्ण बहुमत मिळेल, असा दावा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केला. सत्तेवर आल्यावर राज्यातील एलबीटी हद्दपार करु, असे आश्वासनही त्यांनी दिले.
नगर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अभय आगरकर यांच्या प्रचाराचा नारळ फडवणीस यांच्या हस्ते फोडण्यात आले. नंतर माळीवाडा वेशीजवळ झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. खासदार दिलीप गांधी, माजी मंत्री बबनराव पाचपुते, पक्ष निरिक्षक विठ्ठलराव चाटे, उमेदवार अभय आगरकर, सुनील रामदासी, नगरसेवक सुवेंद्र गांधी, महिला आघाडीच्या पदाधिकारी सुरेखा विद्ये, संगीत खरमाळे, गीता िगल्डा, शहर उपाध्यक्ष अनिल गट्टाणी, संपत नलवडे, शिवाजी लोंढे आदी यावेळी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, भाजप विधानसभा निवडणुकीला आत्मविश्वासाने सामोरा जात आहे. आम्हाला सत्ता हवी आहे, पण ती मंत्री किंवा मुख्यमंत्रिपदासाठी नाही. महाराष्ट्राच्या मानगुटीवर काँग्रेसचे भूत बसलेले आहे. ते उतरवण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे. सत्तेसाठी पदे हे आपले साध्य नाही. सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी भाजपला सत्ता हवी आहे. शंभर दिवसांत मोदी सरकारने मोठी कामगिरी केली आहे. आज संपूर्ण जग भारताकडे अपेक्षेने पाहत आहे. जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता भारताकडे आहे. शहरातील नागरिकांना उत्तम जीवन जगता यावे, यासाठी भाजपने महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. शेतकरी व युवकांसाठी अनेक योजना केंद्र सरकारने हाती घेतल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
मागील 60 वर्षे देशाला लुटायचे काम काँग्रेसने केले. मागील पंधरा वर्षांपासून राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. गेल्या पंधरा वर्षांत महाराष्ट्रात 60 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नवीन उद्योग राज्यात येत नाहीत. शिक्षणात महाराष्ट्राचा दहावा क्रमांक आहे. उच्च शिक्षणाचे खासगीकरण झाले आहे. खासगीकरणाला आपला विरोध नाही, पण त्याच्या व्यावसायिकरणाला विरोध आहे. पैशांसाठी शैक्षणिक संस्था चालवल्या जातात. महाविद्यालये हे डिग्री देणारे कारखाने झाले आहेत. त्यामुळे या क्षेत्रात बदल हवा आहे, असे फडणवीस म्हणाले. नगरमध्ये राजकारणापलिकडे विकासाचे कोणतेही काम झाले नाही. राजकारणाने कधीच पोट भरत नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळून पक्षाची सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भ्रष्टाचार संपवण्यासाठी विभीषण पाहिजेत!
भ्रष्ट्राचाररूपी रावणाचे दहन करण्यासाठी आमच्यासारखे विभीषण पाहिजेत.सर्वांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. एकाच दिवसात 300 कोटींचा प्रकल्प 3 हजार कोटींचा कसा होतो? काँग्रेस-राष्ट्रवादी संपले पाहिजेत. सत्ता आहे म्हणून लोक त्यांचे ऐकून घेत होते, असे सांगत एकप्रकारे पाचपुतेंनी राष्ट्रवादीचे मंत्री भ्रष्टाचार करत असल्याची कबुली दिली. सत्ता गेल्यावर रस्त्यावर चालतानाही त्यांना कुणी विचारणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत भाजपचे काम करणार आहे.'' बबनराव पाचपुते, माजी मंत्री.