आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविकांनी केला भरपावसात शहरात ‘राधे राधे’चा जल्लोष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जिल्हाभरातदोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले असले, तरी श्रीमद् भागवत कथा सप्ताहानिमित्त आज, ऑगस्टला शहरातून निघालेल्या मिरवणुकीत भाविकांनी भरपावसात राधे राधेचा जल्लोष करीत सहभाग नोंदवला.
देश-विदेशात प्रवचन देणाऱ्या केशवजी गौडीय मठ वृंदावन, मथुरा येथील श्री नारायण गोसामी महाराज यांचे शिष्य वंृदावन निवासी श्री वन महाराज यांच्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन खंडेलवाल भवनात ते ११ ऑगस्टदरम्यान करण्यात आले आहे. त्यानिमित्त आज शहरातून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीत आकर्षक रथात श्री वन महाराज अग्रभागी होते, तर त्यामागे डोक्यावर कलशधारण केलेल्या महिलांनी भाग घेतला. वाजत-गाजत, राधे राधेचा गजर करीत ही मिरवणूक खंडेलवाल भवनातून निघून आळशी प्लॉट, अशोक वाटिकामार्गे पुन्हा भवनात पोहोचली. मुख्य यजमान रमेश सेठी अन्य मान्यवरांनी सपत्नीक श्री वन महाराज यांचे स्वागत केले. या वेळी महाराजांनी व्यासपीठावर पोथीचे पूजन करून प्रवचनाला भक्तिभावात प्रारंभ केला. मिरवणुकीत सहभागी महाराजांच्या विदेशी भक्तांनी अकोलेकरांचे लक्ष वेधले. वृंदावन, मथुरा येथे श्री वन महाराज यांच्या सान्निध्यात भागवत धर्माचे ज्ञान प्राप्त करणारे पाश्चात्त्य राष्ट्रातील स्त्री-पुरुष कथा श्रवणासाठी अकोल्यात दाखल झाले आहेत. कथेची पूर्णाहुती ११ ऑगस्टला दुपारी १२ वाजता होणार आहे. दररोज दुपारी ते साडेसातपर्यंत हे प्रवचन भाविकांसाठी सुरू राहील. तरी सर्व धर्मप्रेमी भाविकांनी या आयोजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजन समितीचे रमेश सेठी, अॅड. मोतीसिंह मोहता, अॅड. जी. ए. सारडा, फुलचंद सेठी, डॉ. गोविंद खंडेलवाल, शिवा लाहोटी, सुरेश सेठी, श्रीकृष्ण सेठी, बजरंग सेठी, द्वारका सेठी, संतोष दुसाद, प्रदीप वैद्य, दिलीप झालानी, आशिष गोयल, पीयूष कोरडिया, मनीष कनोजिया, अॅड. सुभाषसिंह ठाकूर, जयंत अग्रवाल, सागर मोकळकर, रमाकांत पांडे, शशिकला सेठी, बसंती सेठी, भारती सेठी, अनिता खंडेलवाल, प्रमिला दुसाद, शोभा बंब, अंशुमाला झालानी, चंदा शर्मा आदींनी केले आहे.
श्रीमद् भागवत कथेनिमित्त निघालेल्या मिरवणुकीतील विदेशी भाविकांनी अकोलेकरांचे लक्ष वेधले.

देखाव्यांचे सादरीकरण
श्रीमद्भागवत कथा सप्ताहाच्या निमित्ताने महिला मंडळाच्या वतीने विविध देखाव्यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. ऑगस्टला वामन अवतार, ऑगस्टला कृष्ण जन्म, ऑगस्टला गोवर्धन पूजा, ऑगस्टला रुक्मिणी विवाहाचा देखावा साकारण्यात येणार असून, ११ ऑगस्टला पूर्णाहुती होईल.
बातम्या आणखी आहेत...