आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवासाठी ‘तालयोगी’चा वाजू लागला नगरी ढोल...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - गणेशोत्सवासाठी तालयोगी प्रतिष्ठानने 70 युवक-युवतींचे वाद्यपथक तयार केले असून त्याचा प्रारंभ रविवारी सावेडीतील समर्थ विद्यामंदिर प्रशालेत मोठ्या दिमाखात झाला.
पारंपरिक ढोल, ताशाशिवाय गणेशोत्सव साजरा होत नाही. पारंपरिक वाद्यांना पुन्हा चांगले दिवस यावेत, यासाठी तालयोगी प्रतिष्ठानने यंदा युवक-युवतींना एकत्र आणून वाद्यपथक तयार केले आहे.
या पथकात वय वर्षे 4 पासून सर्व वयोगटातील वादक आहेत. आमदार अनिल राठोड व महापौर संग्राम जगताप यांच्या हस्ते पथकाचे उद्घाटन झाले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष मोनिका राजळे, नगरसेवक अभिषेक कळमकर, अजिंक्य बोरकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, करीमभाई हुंडेकरी, नरेंद्र फिरोदिया आदी उपस्थित होते.

प्रतिष्ठानचे पदाधिकारी सुजित चव्हाण म्हणाले, गणेशोत्सवानिमित्त ढोलपथक सुरू करण्याचा हा नगरमधील पहिलाच उपक्रम आहे. नवरात्रोत्सवासाठी दांडिया, संगीताच्या मैफिली, नाट्यगीत गायन यासारख्या स्पर्धा प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येतात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीणा दिघे यांनी केले. राम देशमुख यांनी आभार मानले.
वाद्यपथक स्थापन करण्यासाठी सुजित चव्हाण, कैवल्य कुलकर्णी, रोहित गडकर, तन्मय घोडके, अक्षय जगताप, सौरभ गंधे, श्रिया देशमुख यांनी परिश्रम घेतले.

नगरच्या संस्कृतीत मोलाची भर पडेल
ढोल हे संस्कृती जपणारे पारंपरिक वाद्य आहे. तरुणांनी ही वाद्ये शिक ली पाहिजेत. ऐतिहासिक नगर शहराच्या सांस्कृतिक परंपरेत या पथकामुळे भर पडेल, असे प्रतिपादन महापौर संग्राम जगताप यांनी केले. शहराचे वैभव जपणारे हे पथक केवळ नगरपुरते मर्यादित न राहता ते संपूर्ण महाराष्ट्र ात पोहोचावे, अशी अपेक्षा राठोड यांनी व्यक्त केली.