आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरिबांमध्येही वाढतेय मधुमेहाचे मोठे प्रमाण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- देशाच्या लोकसंख्येमध्ये होणार्‍या वाढीपेक्षा मधुमेही रुग्णांच्या वाढीमधला दर अधिक आहे, हे विधान धक्कादायक असले तरी ते वास्तव आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार ‘मधुमेह’ हा आता भारतात नियमित आढळून येणारा रोग झाला आहे. सुखेनैव जीवनशैली जगणार्‍यांना मधुमेह होतो, असा पूर्वी समज होता. परंतु, ग्रामीण भागात, दारिद्रय़रेषेखालील लोकांमध्ये व लहान मुलांमध्येही मधुमेहाचे प्रमाण वाढत असल्याची उदाहरणे आता दिसून येत आहे. हे मधुमेह तज्ज्ञांनीही मान्य केले आहे. मधुमेह म्हणजे रक्तातील ग्लुकोज वाजवीपेक्षा जास्त असलेले प्रमाण होय. ग्लुकोज हे शरीरातील प्रमुख इंधन असल्यामुळे मुख्यत्वेकरून शक्ती निर्माण करायला त्याचा वापर होतो. ग्लुकोज पेशींचा दरवाजा खुला करून देण्याचे काम इन्स्युलीन हे हॉर्मोन करते आणि याच इन्स्युलीनच्या कमतरतेमुळे मनुष्याला मधुमेह होतो. मधुमेह हा कधीही बरा न होणारा आजार असून त्यामुळे होणार्‍या व्याधींमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळून येणारा आजार म्हणजे हृदयविकार होय. बरेचदा हृदयविकाराचे मुख्य कारण मधुमेह हेच असते. मोबाइल, आयपॅड व व्हिडिओ गेम्सच्या जमान्यात मैदानी खेळ मागे पडल्याने लहान मुलांमध्येही मधुमेहाचे प्रमाण वाढत असल्याचे हृदयरोगतज्ज्ञ सांगतात. तसेच बदललेली आहार पद्धती व बैठय़ा जीवनशैलीमुळे युवकांमध्ये आणि मुलांमध्ये मानसिक तणाव निर्माण होतो. यातून त्यांच्यामध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढते, असेही तज्ज्ञ सांगतात. दिवसातील 6 ते 7 तास शाळा, त्यानंतर 2 तास शिकवणी व त्यानंतर सतत तीन तास टीव्ही समोर बसून राहिल्याने मुलांमध्ये मधुमेह वाढत आहे. यावर उपाय म्हणून मुलांनी किमान दोन तास मैदानी खेळ खेळावेत, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

काळजी घेतल्यास नियंत्रणात येतो मधुमेह

उत्प्रेरकांचा वापर वाढला
आजकाल विविध शारीरिक व्याधी व अंगदुखीवर उपाय म्हणून उत्प्रेरके घेतली जातात. संधीवातावर तात्पुरता उपाय म्हणूनही उत्प्रेरकांचा वापर हल्ली वाढत असून तो धोकादायक आहे. कारण नंतर त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. त्यामुळे उपचार म्हणून घेतली जाणारी उत्प्रेरके ही चांगल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आणि ठरावीक प्रमाणातच घ्यावीत.’’ डॉ. संजय सोनवणे, घोडेगाव.
काळजी घेतल्यास नियंत्रणात येतो मधुमेह

मधुमेहाची लक्षणे
खूप तहान लागणे, वारंवार अथवा रात्री लघवीला जावे लागणे, भूक जास्त लागूनही जेवण न जाणे, किंबहुना वजन घटणे आणि अशक्तपणा जानवणे. मधुमेहींना अर्धांगवायू व हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते. तोंड गोड होणे, कानात मळ वाढणे, शरीरावरील मळ व चिकटपणा वाढणे, हातपाय बधीर होणे, मुंग्या येणे, अंग शिथिल होणे, गार पदार्थ आवडणे, हातापायांची जळजळ होणे, रक्तामध्ये साखर वाढण्याच्या आधी ही लक्षणे पूर्वरूप म्हणून निर्माण होतात.

काय काळजी घ्यावी
मधुमेह हा आजार पूर्णपणे बरा होणे शक्य नसते. त्यामुळे मधुमेह होण्याआगोदरच पूर्वकाळजी घेणे हेच अतिशय उत्तम ठरते. पण, मधुमेह हा आजार झालाच, तर योग्य त्या उपचारांनी मधुमेहावर नियंत्रण ठेवणेही शक्य असते. मधुमेहावर नियंत्रण ठेवल्यास त्यातील गुंतागुंत खूप अंशी टाळता येतात, हे देखील आता सिद्ध झाले आहे. मधुमेह या आजारावरील उपचारांमध्ये हलगर्जीपणा करून चालत नाही. त्यामुळे मधुमेही रुग्णावर सातत्यपूर्ण उपचार हीच या आजारावर नियंत्रण ठेवण्याची मुख्य गुरुकिल्ली आहे.