आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानपानावरून लग्न मोडले, १२ जणांवर गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- साखरपुडा झाल्यानंतर वधुपक्षाकडील लोकांनी मान दिला नाही, म्हणून लग्न मोडल्याच्या घटना काहीवेळा घडतात. साखरपुड्यासाठी केलेला खर्चही वाया जातो. शेवगाव पोलिस ठाण्यात मात्र एका वधुपित्याने ऐनवेळी लग्न मोडणाऱ्या वरपक्षाकडील मंडळींविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. शेवगाव पोलिसांनी ही तक्रार घेत वराकडील बाराजणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. शेवगावातील खंडोबानगर परिसरात हा प्रकार घडला.
एका सेवानिवृत्त वधुपित्याने त्याच्या मुलीचे लग्न ठरवले. मध्यस्थी इतर नातेवाईकांनी लग्न जमवले. नंतर साखरपुडाही झाला. तथापि, साखरपुड्यानंतर वधुपित्याने मान दिला नाही, म्हणून वरापक्षाकडील मंडळींनी लग्नालाच नकार दिला. आता पाच लाख रुपये खर्च करावा लागेल, अशी अवाजवी मागणी करत लग्न केले नाही. त्यामुळे साखरपुड्याचा खर्च वाया गेल्याचे आपली फसवणूक झाल्याचे वधुपित्याच्या लक्षात आले. त्यामुळे वधुपित्याने पोलिस ठाण्यात धाव घेत रितसर फिर्याद नोंदवली.
वधुपित्याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी प्रवीण ज्ञानेश्वर मोहरे, ज्ञानेश्वर किसन मोहरे, ज्ञानेश्वरची पत्नी, डॉ. सुनील ज्ञानेश्वर मोहरे, गोरख पी. लहिरे त्याची पत्नी, अंकुश लक्ष्मण गव्हाणे, गोकुळे किसन मोहरे त्याची पत्नी, अनिल किसन मोहरे त्याची पत्नी सर्व (मळेगाव थडी, ता. कोपरगाव), जया राहुल मेहरे (वारी कान्हेगाव, ता. कोपरगाव) यांच्याविरुद्ध फसवणूक, कट रचणे आदी कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवला.
बातम्या आणखी आहेत...