आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Different Style New Year Party In Nagar By Siniour Citizen

हुरडा पार्टी करून ज्येष्ठांचा मावळत्या वर्षाला निरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सारसनगर परिसरातील सारस ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सरत्या वर्षाला आगळ्या वेगळ्या पद्धतीने निरोप देण्यात आला. या संघाच्या सदस्यांनी हुरडा पार्टी साजरी करून नववर्षाचे स्वागत केले.

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी काही जण पहाटेपर्यंत हॉटेलमध्ये आनंद लुटतात. काही जण गाण्याच्या तालावर मद्यधुंद अवस्थेत चित्रविचित्र अंगविक्षेप करताना नाचतात. काही जण घरातच टीव्हीसमोर बसून कार्यक्रम पाहून समाधान मानतात, तर काहीजण सहलीला जाऊन नवीन वर्षाचे स्वागत करतात. या सर्वांना फाटा देऊन सारस ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी हुरडा पार्टी साजरी केली. संघाचे अध्यक्ष माजी प्राचार्य एस. एस. दरेकर यांनी वाळुंज येथील त्यांच्या शेतावर ही पार्टी आयोजित केली होती.

सर्व सदस्यांनी शेतातील रानमेव्याचा आस्वाद घेत नववर्षाचे स्वागत केले. यावेळी तात्यासाहेब दरेकर, एन. डी. देशमुख, रमेश गव्हाणे, विठ्ठल भोरे, पांडुरंग निमसे, एस. एस. बावके, टी. पी. शिंदे, मनोहर कदम, हरिभाऊ ऋणी, काळे, भंडारी आदी उपस्थित होते.