आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अादिवासीबहुल भागात डिजिटल क्लासरूम उभारणीचा श्रीगणेशा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - गणेशाेत्सवात वर्गणीतून जमा झालेल्या पैशातून अादीवासी बहुल भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत डिजिटल क्लास रुम उभारण्याच्या कार्याला साेमवारी प्रारंभ झाला. सामाजिक दातृत्वाच्या भावनेतून युवाराष्ट्र परिवाराने अकाेट तालुक्यातील पाेपटखेड परिसरातील जनुना येथील शाळेत विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाट प्रकाशमय हाेण्यासाठी पुढाकार घेतला अाहे.
विघ्नहर्ता गणपती बाप्पाचे साेमवारी अागमन झाले. यासाठी अनेक मंडळांनी प्रचंड खर्चाचे नियाेजन केले अाहे. मात्र उत्सवात अनावश्यक खर्च टाळून कृतीतून सामजिक परिर्वतन करणाऱ्या “युवाराष्ट्र” परिवार या संघटनेने जनुना येथील आदीवासी कोरकू बालकांसाठी “डिजिटल क्लासरूम” उभारण्याचा संकल्प केला. यासाठी जवळपास दीड लाख रुपयांचा खर्च अपेक्षित अाहे. यासाठी ७० पेक्षा जास्त सदस्यांनी वर्गणीही दिली अाहे.

शिक्षक दाम्पत्य झटतेय अादीवासी विद्यार्थ्यांसाठी : दुधमराबारेवार सुनीता बारेवार हे शिक्षक दाम्पत्य २००३मध्ये जनुना या दुर्गम भागातील गावात बीड येथून अाले. २००३मध्ये पटावर केवळ २० विद्यार्थी तसेच ते वर्ग हाेते. अादीवासी भागात शिक्षणाच्या जागृतीसाठी बारेवार दाम्पत्याने संकल्प केला. घराेघरी जाऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. चित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वििवध प्राणी, सािहत्याची अाेळख करुन दिली. त्यांच्यात शिक्षणाची अावड निर्माण होण्यासाठी इतर शिक्षक ग्रामस्थांना साेबत घेऊन प्रयत्न केले. जवळपास १२ वर्षे बारेवार गुरुजी यांनी मुख्याध्यापकपदाचीही जबाबदारी सांभाळली. अाज शाळेत इयत्ता ते पर्यंत वर्ग असून, विद्यार्थ्यांची संख्या १६७ पर्यंत पाेहाेचली अाहे.
रंगरंगाेटीपासून सुरुवात
डिजिटल क्लास रुमच्या कार्याला रंगरंगाेटीपासून प्रारंभ झाला. याप्रसंगी सरपंच संजय कासबे, माजी सरपंच अात्माराम ढिगर, बाजीराव मावसकर, शिक्षक दुधराम बारेवार यांच्यासह युवाराष्ट्र परिवाराचे धनंजय मिश्रा, अविनाश नाकट, डाॅ. निलेष पाटील, विलास ताथाेड अादी उपस्थित हाेते. अकाेल्यातील युवाराष्ट्रच्या कार्यकर्त्यांनी जनुना येथे ग्रामस्थांसाेबत युवाराष्ट्र गणेशाेत्सव मंडळाची स्थापना केली.
बातम्या आणखी आहेत...