आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Diki Two Of Three Million Miskinamala Road Incident Afternoon

दुचाकीच्या डिकीतील तीन लाख लुबाडले-मिस्किनमळा रस्त्यावरील घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-तोफखाना पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मिस्किन मळा रस्त्यावर मंगळवारी भरदिवसा तीन लाखांची रोकड लुटण्याची घटना घडली.

तुकाराम नाथू मते (59, शेंडी, ता. नगर) हे सावेडीतील आदित्य कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयात ऑफिस बॉय आहेत. व्यवस्थापक दत्तात्रेय खेडकर यांनी सकाळी 11 वाजता त्यांच्याकडे तीन लाख रुपयांचा धनादेश दिला. माळीवाडा येथील एचडीएफसी बँकेतून धनादेश वटवून रोकड घेऊन येण्यास मते यांना सांगण्यात आले. त्यानुसार ते मोटारसायकलीवरून (एमएच 16 के 1163) माळीवाड्यात गेले. तीन लाखांची रोकड मोटारसायकलीच्या डिकीत ठेवून बाराच्या सुमारास ते तारकपूरकडून ऑफिसकडे निघाले. पोलिस अधिकार्‍यांचे विर्शामगृह असलेल्या वसंतकीर्तीसमोरच्या पुलाजवळ मोटारसायकलीवरून आलेल्या दोघांनी त्यांची गाडी अडवली. बाचाबाची करण्याचा बहाणा करत चोरट्यांनी डिकी उघडून आतील रोकड घेऊन पोबारा केला.

तोफखाना पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली. मिस्किन मळा रस्त्यावर अशा प्रकारच्या घटना काही दिवसांपासून सातत्याने घडत आहेत.