आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dilip Gandhi News In Marath,BJP, Nagar Lok Sabha Constituncy, Divya Marathi

गांधींच्या प्रचारात युतीचे जि. प. सदस्य सक्रिय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांच्या प्रचाराने आता वेग घेतला आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या गटनिहाय प्रचार सुरू असून गांधींच्या प्रचारासाठी आमदार शिवाजी कर्डिले यांची यंत्रणा कामाला लागली आहे.
जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी 17 एप्रिलला मतदान होणार आहे. प्रचारासाठी अवघे काही दिवस हातात असल्याने कमी वेळेत जास्तीत जास्त गावे पिंजून काढण्यात कार्यकर्ते व उमेदवार व्यग्र आहेत. काँग्रेस आघाडीचे राजीव राजळे यांनी सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतली असून ठिकठिकाणी त्यांचे प्रचारफलक लागले आहेत. देशात मोदी लाट असल्याने काहीसे निवांत असलेल्या गांधींनीही शेवटच्या आठ दिवसांत प्रचाराला गती दिली आहे. सुरुवातीला मोजकेच पदाधिकारी भाजपच्या प्रचारात सक्रिय झालेले दिसत होते. मात्र, आता आमदार कर्डिले यांची यंत्रणादेखील कामाला लागली आहे.


शिवसेना व भाजपचे जिल्हा परिषद सदस्य गटनिहाय प्रचार करत आहेत. नगर तालुक्यात सभापती सुनीता नेटके यांच्यासह, सदस्य मंदा गायकवाड यांनी निमगावघाणा, खारेकर्जुने, इसळक, नांदगाव, देहरे, विळद येथील प्रचारात सहभाग घेतला. भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर गांधी यांना जनमताचा पाठिंबा वाढेल, असा महायुतीचा विश्वास आहे. तथापि, मोदींच्या सभेनंतर फारसा परिणाम होणार नाही, असा आघाडीच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे.