आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dilip Gandhi News In Marathi, BJP, Nagar Lok Sabha Constituncy, Pratap Dhakane

काटे पेरण्याशिवाय तुम्ही आतापर्यंत काय केले?, दिलीप गांधी यांची ढाकणेंवर टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - तुमचे भाग्य व कर्म योग्य नव्हते, त्याला मी काय करू? उमेदवारी मिळायलासुद्धा नशिबाची साथ लागते. आंबे लावले, तर आंबेच मिळतील. तुम्ही काटे पेरण्याशिवाय काय केले? अशा शब्दांत खासदार दिलीप गांधी यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांचे नाव न घेता टीका केली.
ढाकणे यांचे गाव असलेल्या अकोले येथे बुधवारी रात्री आयोजित सभेत गांधी बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार दगडू बडे होते. अँड. दिनकर पालवे, वसंत खेडकर, अँड. संपत गज्रे, सुरेश भागवत, सुनील पाखरे, अँड. सतीश पालवे, अशोक गर्जे, अशोक चोरमले, विजय मंडलेचा, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राम लाड यावेळी उपस्थित होते. यावेळी शंभर तरुणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे जयदत्त गज्रे यांनी जाहीर केले. गांधी यांनी प्रथमच कठोर शब्दांत ढाकणेंचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, खासदारकी आम्ही समाजाला सर्मपित केली. सूडबुद्धीने व पक्षविचारांशी प्रतारणा केली नाही. सतत चांगले पेरायचा विचार केला. त्याची फळे मिळत गेली. मला बदनामी करायला काहीच सापडले नाही, तर अर्बन बँकेतील मुद्दय़ांना पुढे करत चारित्र्यहनन सुरू केले.
स्वार्थासाठी साखरसम्राट एकत्र आले. कारखान्यासाठी तुमचे मॅच फिक्सिंग चालते. सर्वजण मिळून शेतकर्‍यांच्या जिवावर उठलात. तुमच्या अपप्रचारावर जनतेचा विश्वास नाही, असे ते म्हणाले. महाराष्ट्र शासनाने औद्योगिक विकासाचे धोरण बाजूला ठेवले. गेल्या दहा वर्षांत एकही औद्योगिक वसाहत झाली नाही. नेतृत्वहीन सरकारला रोजगार व सिंचनाचे प्रश्न सोडवता आले नाहीत. देशाचे धोरण व चेहरा ठरवणारी ही निवडणूक आहे. तरुणाईसुद्धा नरेंद्र मोदींच्या मुद्दय़ावर प्रथमच संघटित होऊन स्पष्टपणे बोलू लागली आहे, असे गांधी यांनी यावेळी सांगितले.