आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाथर्डी - खासदार गोपीनाथ मुंडे, आमदार राम शिंदे व शिवाजी कर्डिलेंना डावलून, दिल्लीत ‘सेटिंग’ लावून खासदार दिलीप गांधी यांनी नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे उमेदवारी मिळवली. आता त्यांनी निवडून येऊन दाखवावे, असे खुले आव्हान देत दोन दिवसांत माझी भूमिका स्पष्ट करेन, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. प्रताप ढाकणे यांनी शुक्रवारी जाहीर केले. आपली नाराजी व्यक्त करत त्यांनी बंडखोरीचाच पवित्रा घेतला.
पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक दुपारी झाली. एक हजार निवडक कार्यकर्त्यांनी या वेळी खासदार गांधी यांच्या विरोधात आक्रमकपणे नाराजी व्यक्त केली. अॅड. ढाकणे यांनी स्वतंत्रपणे निर्णय घ्यावा, असे आवाहन कार्यकर्त्यांनी केले.
बैठकीस प्रदेश संघटक सदा देवगावकर, महिला बालकल्याण समितीच्या सभापती हर्षदा काकडे, किसान आघाडीचे प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब ढाकणे, स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष रा. पा. शिरसाठ, सेनेचे तालुकाप्रमुख रफिक शेख आदी उपस्थित होते. प्रदेश पार्लमेंटरी समितीची शिफारस नसताना मुंडे, कर्डिलेसह जिल्हा भाजपचा विरोध असताना गांधींनी तिकीट आणले. आता निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले.
खासदार गांधी यांनी कधी शेवगाव तालुक्यात कामे केली नाहीत. गांधी हे पक्षांतर्गत कार्यकर्त्यांची परतफेड करत नाहीत. उलट राष्ट्रवादीच्या उमेदवाराची परतफेड करतात, असा आरोप महिला व बालकल्याण सभापती हर्षदा काकडे यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.