आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वैद्यकीय संशोधनाचा अभाव दूर होणे गरजेचे, डॉ. दिलीप म्हैसेकर यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - देशातलोक संख्येमुळे संशोधनासाठी आवश्यक ती माहिती सहज उपलब्ध होऊ शकते, पण वैद्यकीय संशोधन फारसे होत नाही. ही परिस्थिती बदलण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केले. डॉक्टरांमध्ये सेवाभाव वाढवण्यासाठी समुपदेशन सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, देशात वैद्यकीय संशोधन मोठ्या प्रमाणात होण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक ती माहिती (रिसर्च डाटा) मिळण्यासाठी लोकसंख्या आपल्याकडे आहे. फक्त संशोधनासाठी मानसिकता तयार होण्याची गरज आहे.

लोकसंख्येमागे डॉक्टरांची संख्या कमी असण्याबाबत ते म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार १००६ लोकसंख्येमागे एका डॉक्टरची गरज आहे. मात्र, आपल्याकडे १८६४ लोकांमागे एक डॉक्टर आहे. सरकारी रुग्णालयांत डॉक्टरांची पदे रिक्त राहतात, खासगी प्रॅक्टिस करण्यावर डॉक्टरांचा भर असतो. ग्रामीण भागात डॉक्टरांची खूप कमतरता जाणवतेे. ती दूर करण्यासाठी फेलोशिप कोर्सेस सुरू करण्यात येतील. त्यामुळे ग्रामीण भागात डॉक्टर उपलब्ध होतील, असे डॉ. म्हैसेकर म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...