आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dilit Youth Murder Issue At Kherde, Divya Marathi

काँग्रेसचे मंत्री राऊत यांनी अकलेचे दिवाळे काढले - श्याम असावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - खर्डा येथील दलित तरुणाच्या हत्येप्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे गप्प का, या काँग्रेसचे राज्य रोजगार हमी मंत्री नितीन राऊत यांच्या प्रश्नास सामाजिक कार्येकर्ते श्याम असावा यांनी मंगळवारी प्रत्युत्तर दिले. अण्णांवर बिनबुडाचे आरोप करून राऊत यांनी स्वत:च्या अकलेचे दिवाळे काढले असल्याची टीका असावा यांनी केली आहे.

असावा म्हणाले, या हत्याप्रकरणाचा अण्णांनी तीव्र निषेध केला आहे. वर्तमानपत्रांमधून तशा बातम्याही छापून आलेल्या आहेत. असे असतानाही राऊत अण्णांवर आरोप करून दिशाभूल करत आहेत. पक्षातील वरिष्ठ नेत्यांची र्मजी सांभाळण्यासाठीच त्यांचा हा खटाटोप आहे. राज्यात खैरलांजी ते खर्डा ही सर्व दलित अत्याचाराची प्रकरणे काँग्रेसच्या कार्यकाळात झाली आहेत. त्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण न देता खर्डा प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न राऊत करत आहेत.

काँग्रेसने आतापर्यंत दलितांचा वापर केवळ मतांसाठी केला आहे, अशी टीका करून असावा म्हणाले, राळेगण येथील दलित कुटुंबावर आतापर्यंत कोणताही अन्याय झालेला नाही. उलट दलितांचे कर्ज फेडण्यासाठी ग्रामस्थांनी त्यांच्या शेतीवर र्शमदान केले. पोळ्याच्या सणाला आजही दलितांच्या बैलांना पहिला मान आहे. दलितांना दारिद्रय़ रेषेखालून वर आणण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले आहेत. हा सर्व इतिहास राऊत यांनी तपासावा आणि मगच अण्णांवर आरोप करावेत.
दौर्‍यावर असताना नागपूर येथे अण्णांच्या गाडीवर हल्ला घडवून आणणार्‍या या मंत्र्याला कोणत्याच हिंसाचार अथवा अत्याचाराच्या घटनेबाबत बोलण्याचा अधिकार नाही. अण्णांनी आतापर्यंत सामाजिक प्रश्नांवर काय आंदोलने केली, त्याबाबत शासनाकडे कसा पाठपुरावा केला, हे राऊत यांनी तपासून पाहण्याची गरज आहे. राऊत यांनी सामान्य जनतेला आधी या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत, मगच स्वत:च्या अकलेचे दिवाळे काढावे, अशी टीका आसावा यांनी केली.
रणपिसे यांना सभापतिपदापासून का दूर ठेवले?

काँग्रेस हे बुडते जहाज आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट केले होते. काँग्रेसच्या मंत्र्यांना दलितांवरील हल्ल्यांचा केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी वापर करून घ्यायचा आहे. त्यापेक्षा काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामा देऊन दलितांवरील अत्याचाराच्या विरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करावा. शरद रणपिसे हे केवळ दलित असल्यामुळे त्यांना सभापतिपदापासून दूर ठेवण्यात आले, याचा खुलासा राऊत यांनी करावा, अशी टीकाही असावा यांनी केली.
अण्णा हजारे यांचे कार्यकर्ते श्याम आसावा यांचे प्रत्युत्तर