आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिनेश मोरेने गाजवला दुसरा दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पोलिस कॉन्स्टेबल दिनेश मोरे याच्या जलदगती कामगिरीने जिल्हास्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धेचा दुसरा दविस गाजला. मोरे यांनी ४०० मीटर, ८०० मीटर, ४०० मीटर अडथळा या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत निर्विवाद वर्चस्व सदि्ध केले. उंच उडीतही त्यांनी दुसरा क्रमांक पटकावला. कबड्डी स्पर्धेत नगर शहर विभागाने बाजी मारली.

बुधवारी झालेल्या मैदानी स्पर्धेचा निकाल याप्रमाणे - ४०० मीटर धावणे पुरुष - दिनेश मोरे, रोहति डावाळे. ४०० मीटर धावणे महिला - मनीषा निमोणकर, जयश्री सुपेकर. ८०० मीटर धावणे पुरुष - दिनेश मोरे, रोहति डावाळे, ८०० मीटर धावणे महिला - जयश्री सुपेकर, छाया गायकवाड. १० हजार मीटर धावणे पुरुष - लुमा भांगरे, लक्ष्मण खोकले. ४०० मीटर अडथळा धावणे पुरुष - दिनेश मोरे, रोहति डावाळे, ४०० मीटर अडथळा धावणे महिला - वर्षा कदम, वैशाली हासे.
१०० मीटर अडथळा धावणे पुरुष - रोहति डावाळे, मनोज गुंजाळ. ११० मीटर अडथळा धावणे महिला - वैशाली हासे, रुपाली राजगिरे. लांब उडी पुरुष - बाबासाहेब कोरेकर, दिनेश मोरे, लांब उडी महिला - रूपाली राजगिरे, कीर्ती कांजवणे. उंच उडी पुरुष - बाबासाहेब कोरेकर, दिनेश मोरे, उंच उडी महिला - वैशाली हासे, मनीषा निमोणकर. तिहेरी उडी - बाबासाहेब कोरेकर, दिनेश मोरे. गोळा फेक - अमोल गाडे, रवींद्र मेढे. थाळी फेक पुरुष - गजानन गायकवाड, जावेद शेख. हॅमर - गजानन गायकवाड, जावेद शेख.

कबड्डी - नगर ग्रामीण विरुद्ध नगर शहर यांच्यात झालेल्या सामन्यात २ गुणांनी नगर शहर विजयी. फुटबॉल - पोलिस मुख्यालय विरुद्ध नगर शहर यांच्यात झालेल्या सामन्यात २ गोलने पोलिस मुख्यालय संघ विजयी. हँडबॉल स्पर्धा - संगमनेर विभाग विरुद्ध पाेलिस मुख्यालय विभाग यांच्यात झालेल्या सामन्यात २ गोलने संगमनेर विभाग संघ विजयी. बास्केटबॉल स्पर्धा - पोलिस मुख्यालय संघ विरुद्ध श्रीरामपूर विभाग यांच्यात झालेल्या सामन्यात श्रीरामपूर संघ ३ गोलने विजयी झाला. व्हॉलिबॉल स्पर्धेत नगर ग्रामीण संघ विजयी झाला, तर श्रीरामपूर संघ उपविजयी ठरला. गुरुवार हा स्पर्धेचा अंतिम दविस आहे.
क्रीडाज्योत प्रज्वलीत करून उदघाटन
जिल्हा पोलिस दलाच्या क्रीडा स्पर्धांचे मंगळवारी सायंकाळी दिमाखदार उद्घाटन झाले. खेळाडूंच्या विविध पथकांनी रंगीबेरंगी जॅकेट घालून सय्यद अन्वर यांच्या नेतृत्वाखाली शानदार संचलन केले. बाबा कोरेकर यांनी क्रीडा मशाल प्रज्वलति करुन पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांच्याकडे सुपूर्द केली. त्यांनी मशालीद्वारे क्रीडा ज्योत प्रज्वलीत केली. रंगीबेरंगी फुले आणि कबुतरे आकाशात सोडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलिस मोठ्या संख्येने उपस्थिती होते.