आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dipip Gandhi News In Marathi, Abhay Aagarkar Speak In Rally At Nagar, Divya Marathi

गांधी यांच्या कामामुळे भाजपची मान उंचावली, अभय आगरकर यांचे प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- खासदार काय असतो व त्यांचा निधी काय असतो हे खासदार दिलीप गांधी यांनी दाखवून दिले. खासदार निधीतून त्यांनी मोठी विकासकामे करून मतदारसंघाच्या विकासाला हातभार लावला. गांधी यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाची मान उंचावली, असे प्रतिपादन शहराध्यक्ष अभय आगरकर यांनी केले.


युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष सुवेंद्र गांधी यांच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन आगरकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष मधुसूदन मुळे, खासदार गांधी, सुनील रामदासी, डॉ. प्रकाश व डॉ. सुधा कांकरिया, आसाराम ढूस, शरद दळवी, मालन ढोणे, महेश तवले, गीता गिल्डा, नितीन शेलार यावेळी उपस्थित होते. आगरकर म्हणाले, 1999 मध्ये खासदारकीची निवडणूक लढवण्यास मी इच्छुक होतो. मात्र, दिलीप गांधी यांचे नाव पुढे करून मी त्यांना पाठिंबा दिला. त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करून मतदारसंघाचा विकास केला.

दिलीप गांधी म्हणाले, शहराच्या विकासासाठी भाजप कटिबध्द आहे. देशात मोदी लाट आली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात आता भाजपची सत्ता येईल.