आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहा महिन्यांत साथीच्या रोगांचे ८९१ रुग्ण हे कशाचे द्योतक?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दूषितपाणी असलेल्या जिल्ह्यातील गावांची संख्या दीडशेवर असताना शंभर टक्के ग्रामपंचायतींना आरोग्य विभागाने हिरव्या कार्डच्या यादीत टाकून चमत्कार केला. जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांत साथीच्या रोगांचे ८९१ रुग्ण आढळून आले. त्यात जलजन्य आजारांच्या ३१५ रुग्णांचा समावेश आहे, जर स्वच्छतेबाबत सर्व ग्रामपंचायती चांगले काम करून हिरव्या कार्डास पात्र असतील, तर जलजन्य आजारांचा उद्रेक कसा झाला, असा सवाल उपस्थित झाला आहे. या गंभीर विषयाकडे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. डी. गांडाळ यांचेही दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

नागरिकांचे आरोग्य सदृढ चांगले राहण्यासाठी राज्यासह देशभरात स्वच्छता अभियान राबवले जात आहे. सरकारकडून आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्यासाठी वेळोवेळी विविध शासननिर्णय जारी केले गेले आहेत. परंतु त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात प्रशासन कमी पडत असल्याचे समोर आले आहे. स्वच्छतेविषयक ११ प्रश्नांवर गावाची परिस्थिती चांगली किंवा जोखमीची याचा अहवाल तयार केला जातो. यामध्ये अस्वच्छतेच्या निकषांवर पंधरा ते वीस प्रतिप्रश्नासाठी गुणदान केले जाते. जलस्त्रोताभोवतीचा परिसर अस्वच्छ असणे, टीसीएलमधील क्लोरिनचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी असणे, जलस्त्रोतांभोवतीचा परिसर अस्वच्छ असणे अशा ११ प्रश्नांचा कार्डवाटप करताना समावेश करून गुणदान केले जाते. संबंधित गावाला जेवढे जास्त गुण, तेवढी त्या गावातील जोखीम जास्त (धोका जास्त) असे सरकारने २९ ऑगस्ट २०१२ च्या निर्णयात स्पष्ट केले. अस्वच्छतेचे ७० पेक्षा जास्त गुण असतील, तर लाल कार्ड, ३० ते ६५ गुण असतील, तर पिवळे ते ३० गुण असतील, तर कमी जोखमीबाबत हिरवे कार्ड दिले जाते. जिल्ह्यात एवढी अलबेल परिस्थिती नसताना आरोग्य विभागाने शंभर टक्के गावे हिरवे कार्डास पात्र ठरवली हा चमत्कार आश्चर्यचकीत करणारा आहे.

जलजन्य आजारांत वाढ
जानेवारीते ऑक्टोबर २०१६ या कालावधीचा आरोग्य विभागाने जलजन्य कीटकजन्य साथ उद्रेकाबाबतचा अहवाल तयार कला. या अहवालात साथरोगाची ८९१ रुग्णांना लागण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. विशेष म्हणजे अतिसार, गॅस्ट्रो या साथीचे सुमारे ३१५ रुग्ण आढळून आले, जर आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत सर्व ग्रामपंचायती कमी जोखमीच्या होत्या, तर जलजन्य आजारांचे रुग्ण कसे आढळून आले, असा सवाल सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे. सोयीने अहवाल तयार करून सारेच अलबेल दाखवण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

सारेच अलबेल कसे ? ग्रामपंचायतींच्याराजकारणात आपले गाव अालबेल दाखवण्यासाठी ग्रामपंचायत हिरव्या कार्डाच्या यादीत दाखवण्यांची स्थानिक पुढाऱ्यांना असलेली घाई, उदासीन अधिकारी कर्मचारी या प्रकारामुळे दूषित पाणी असलेली काही गावे हिरव्या कार्डाच्या यादीत पोहोचली आहेत.

आमचा अहवाल खरा
सर्वेक्षणकरतानागावे कमी जोखमीत होती. त्यामुळे हिरवे कार्ड देण्यात आले. आम्ही तयार केलेल्या अहवालात गोलमाल नाही, तो बरोबरच आहे. जलसुरक्षकांसह ग्रामपंचायतींची भूमिका महत्त्वाची आहे. पुढील सर्वेक्षणात काटेकोर अंमलबजावणीच्या सूचना दिल्या जातील.
- डॉ. बापूसाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी.
बातम्या आणखी आहेत...