आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Disclose Maharashtra Gujarat Agreement, Vikhe Appeal To Chief Minister

महाराष्ट्र-गुजरातचा करार जाहीर करा, विखे यांचे मुख्‍यमंत्र्यांना आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातकडे वळवण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रश्नावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र व गुजरातदरम्यान झालेल्या पाणीवाटप कराराचा तपशील मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

‘महाराष्ट्राचे पाणी गुजरातला दिले जाणार नाही असे मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांचे म्हणणे आहे. मात्र, यासंदर्भात निर्माण झालेला संभ्रम दूर करायचा असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्याबाबतचा तपशील राज्य सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करावा,’ अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे.