आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठकांचे सत्र सुरूच; पण काम जागेवर !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फेज टूच्या रखडलेल्या कामाबाबत महापौर अभिषेक कळमकर यांनी सोमवारी आढावा बैठक घेतली. यावेळी उपमहापौर सुवर्णा कोतकर, दादा कळमकर उपस्थित होते.)
नगर - वारंवार आढावा बैठका घेऊनही शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेचे (फेज टू) काम पुढे सरकत नाही. प्रत्येक आढावा बैठकीत ठेकेदार संस्था मनपाचे अधिकारी "होयबा'ची भूमिका बजावतात. महापौर अभिषेक कळमकर यांनी सोमवारी घेतलेल्या आढावा बैठकीतही हेच चित्र कायम होते. समन्वय ठेवून तातडीने काम पूर्ण करण्याच्या सूचना कळमकर यांनी दिल्या असल्या, तरी त्याची अंमलबजावणी होईल का, याबाबत शंकाच आहे.

केंद्र शासनाच्या युआयडीएसएसएमटी योजने अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या फेज टू योजनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी महापौर कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी महापालिकेत बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादा कळमकर, उपमहापौर सुवर्णा कोतकर, प्रभारी आयुक्त विलास वालगुडे, उपायुक्त अजय चारठाणकर, स्थायी समिती सभापती गणेश भोसले आदी उपस्थित होते. महापौर कळमकर यांनी ठेकेदार संस्थेच्या प्रतिनिधींना कामास गती देण्याच्या सूचना दिल्या. मनपा अधिकारी, प्रकल्प व्यवस्थापन संस्था ठेकेदार संस्था यांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक आढावा बैठकीप्रमाणे यावेळीही अधिकारी ठेकेदार संस्थेच्या प्रतिनिधींनी होयबाची भूमिका घेत वेळ मारून नेली. जुलैला पुन्हा आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे कळमकर यांनी सांगितले.
तत्कालीन महापौर शीला शिंदे संग्राम जगताप यांनी आपल्या कार्यकाळात हाच फॉर्म्यूला वापरला.
महिना-दीड महिन्यातून एक बैठक त्यात ठरलेली उत्तरे, हा प्रकार गेल्या तीन-चार वर्षांपासून सुरू आहे. जून २०१० मध्ये योजनेचे काम सुरू करण्यात आले. मुदत संपल्यानंतर ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतही तीन महिन्यांपूर्वी संपली. अाता ठेकेदार संस्थेला तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.

५६ - कोटी ठेकेदाराला अदा
६९ - कोटी शासनाकडून प्राप्त
११६ - कोटींची योजना

वर्षांपासूनरखडले काम
ठेकेदार अधिकाऱ्यांचे होयबा

- वितरणव्यवस्थेचे काम सुरू करणार
- ठेकेदाराशी समन्वय ठेवून काम करणार
- मुळानगर येथे पंप मोटार लवकरच बसवणार
- मुळानगर विळद येथे केबल टाकणार
- लाइनअाऊटप्रमाणे पाइप अंथरणार

कामातील अडचणी कायम
योजनेचेकाम सुरू करून साडेचार वर्षे झाले, परंतु मनपा प्रशासनाने अद्याप या कामाचे लाईनआऊट दिलेले नाही. त्यामुळे काम करण्यास अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी नगरसेवकांनी काम बंद पाडले. अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यासाठी अडथळा ठरणारे अतिक्रमण काढणे गरजेचे आहे, परंतु मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. मग आम्ही काम कसे करणार, असा सवाल उपस्थित करत ठेकेदार संस्थेने तीन महिन्यांपूर्वी काम बंद केले होते. हे काम पुन्हा सुरू झाले असले, तरी ठेकेदार संस्थेने उपस्थित केलेले प्रश्न अजूनही कायम आहेत. त्यामुळे योजनेच्या कामास गती मिळेल का, याबाबत शंकाच आहे.

आता महिन्यातून दोनदा बैठक
प्रकल्प व्यवस्थापन संस्था, मनपा अधिकारी ठेकेदार संस्था यांनी त्यांची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत. मनपा अभियंत्यांनी योजनेच्या कामासाठी जास्तीत जास्त वेळ द्यावा, अशा सूचना महापौर कळमकर यांनी संबंधितांना दिल्या. शिवाय आता योजनेच्या कामाचा दर महिन्याच्या दुसऱ्या चौथ्या मंगळवारी आढावा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...