आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाडिया पार्कला छत्रपतींचे नाव देण्यास जिल्हा प्रशासनाची आडकाठी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेच्या मालकीची जागा असलेल्या वाडिया पार्कला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा ठराव काही दिवसांपूर्वी महासभेने केला. मात्र, वाडिया पार्क ही शासनाची मालमत्ता असून त्यास छत्रपतींचे नाव देता येणार नाही, असे पत्र जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी महापालिकेला दिले असल्याची माहिती बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी महासभेत दिली. दरम्यान, वाडिया पार्कची जागा महापालिकेच्या मालकीची असल्याने या मालमत्तेला तातडीने छत्रपतींचे नाव द्यावे, असा ठराव बुधवारी महासभेत झाला.

वाडिया पार्कला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यासाठी महापालिका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे ना-हरकत प्रमाणपत्राची मागणी केली होती. वाडिया पार्कला छत्रपतींचे नाव देण्याचा ठराव काही दिवसांपूर्वीच महासभेत मंजूर करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नाव देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे ना-हरकत प्रमाणपत्राची मागणी केली होती. बुधवारी झालेल्या महासभेत वाडिया पार्कच्या नामकरणाचा मुद्दा उपस्थित झाला. वाडिया पार्क ही आता शासनाची मालमत्ता असून शासन निर्णयानुसार या मालमत्तेचे नामकरण करता येणार नाही, असे पत्र जिल्हाधिकारी कवडे यांनी महापालिका प्रशासनाला दिले असल्याची माहिती महासभेत समोर आली.

नगरसेवक कैलास गिरवले यांनी मात्र वाडिया पार्कच्या जागा हस्तांतरणाचा कोणताही ठराव तत्कालीन नगरपालिकेने केलेला नसल्याचे सभागृहात स्पष्ट केले. वाडिया पार्कवर जिल्हा क्रीडा समितीचे नियंत्रण असले, तरी जागेचा मालकी हक्क मात्र महापालिकेचाच असल्याचे त्यांनी सांगितले. स्थायीचे सभापती सचिन जाधव यांनीही वाडिया पार्कची जागा महापालिकेची असून छत्रपतींचे नाव लावण्यासाठी काेणाच्याही परवानगीची गरज नसल्याचे सांिगतले. वाडिया पार्कला छत्रपतींचे नाव लावण्याची कार्यवाही आठ दिवसांत पूर्ण करा, अशी मागणी सभागृहाने महापालिका प्रशासनाकडे केली. शिवजयंतीच्या आधी वाडिया पार्कला छत्रपतींचे नाव देण्याची कार्यवाही पूर्ण करा, असे आदेश महापौर सुरेखा कदम यांनी प्रशासनाला दिले.

वाडिया पार्कला छत्रपतींचे नाव देण्यात जिल्हा प्रशासन आडकाठी आणत आहे, मग जिल्हा प्रशासनाला वाडिया पार्कचे एम. आर. ट्रेड सेंटर असे नामकरण झालेले चालते का? असा सवाल सभागृहाने उपस्थित केला. वाडिया पार्कचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने वाडिया पार्कवर एम. आर. ट्रेड सेंटरचा बोर्ड लावला आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने हा बोर्ड काढून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा बोर्ड लावावा, अशी मागणी सभागृहाने केली.

वाडियांचे काय?
वाडियापार्कची जागा पारशी समाजातील सेवाभावी वाडिया परिवाराने नगरपालिकेला देताना काही अटी घातल्या होत्या. ही जागा खेळासाठीच वापरली जावी, असे त्यात नमूद करण्यात आले होते. कोट्यवधी किमतीची जागा वाडियांनी दिली असल्याने त्यांचे नाव कायम ठेवायला हवे, असे काही संघटना संस्थांचे मत असून यासंदर्भात पूर्वी आंदोलनेही झाली. एम.आर. ट्रेड सेंटरचे नाव क्रीडा संकुलाला देण्यास विरोध झाल्याने वाडिया हेच नाव कायम ठेवण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...