आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Bank Director Boards Election Form Fill Up Starts Today

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास शनिवारपासून (४ एप्रिल) सुरुवात होत आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशेजारी पद्मश्री विखे सभागृहात अर्ज भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व २१ जागांसाठी तेथेच अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी दिगंबर हौसारे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेची निवडणूक होत आहे. शनिवारपासून अर्ज विक्री स्वीकृती सुरू होत असल्याची माहिती हौसारे यांनी दिली. दरम्यान, सत्ता मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांच्या व्यूहरचनांना वेग आला आहे. बँकेच्या सत्तेसाठी पारंपरिक प्रतिस्पर्धी काँग्रेस अंतर्गत गटातील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे विरूद्ध माजी मंत्री बाळासाहेब थोरात यंाच्यातच सामना रंगण्याची शक्यता आहे. आपापले गट आणखी मजबूत करण्याच्या हालचालींना या दोन्ही नेत्यांकडून वेग देण्यात आला आहे.
भाजपची अजूनही तळ्यात-मळ्यात अवस्था आहे. विखे किंवा थोरात गटाकडे जायचे की ताकद अजमायची, यावर खल सुरू आहे. अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीनंतरच २४ एप्रिलच्या सायंकाळी लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका सुरू झाल्या आहेत.