नगर - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत आमदार बाळासाहेब थोरात राष्ट्रवादीच्या शेतकरी विकास मंडळाने काठावर बहुमताचा आकडा गाठत सत्ता राखली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे भाजपच्या जिल्हा विकास आघाडीला जागांपर्यंत मजल मारता आली. प्रतिष्ठेच्या या लढतीत थोरात यांनी राष्ट्रवादीच्या साथीने विखे भाजपला चीत केले.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक नाडी असलेल्या जिल्हा बँकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी पारंपरिक विरोधक असलेल्या थाेरात विखे यांनी सुरुवातीपासूनच विविध खेळ्या केल्या. थोरात यांनी राष्ट्रवादी, तसेच भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांना बरोबर घेत निवडणूक एकतर्फी करण्याचा प्रयत्न केला. त्याला छेद देत विखे यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी संधान साधून भाजपची साथ मिळवण्याची खेळी केली. तत्पूर्वी त्यांनी शेतीपूरक, बिगरशेतीसह
राखीव अशा एकूण जागा बिनविरोध करण्याची खेळी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी केली. थोरात, विखे मधुकर पिचड यांच्यात शेवटच्या दिवशी समोरासमोर खलबते झाली. अर्ज माघारी घेण्याची मुदत संपण्याच्या शेवटच्या क्षणी तडजोड फिस्कटली. त्यानंतर विखे यांनी भाजप-शिवसेनेला बरोबर घेत जिल्हा विकास आघाडीची मोट बांधली. थाेरात गटाकडून जाहीर प्रचाराच्या सभा झाल्या, तर विखे गटाने प्रचार संपण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप-सेनेच्या नेत्यांसह संयुक्त मेळावा हा एकमेव जाहीर कार्यक्रम घेतला.
एकूण २१ संचालकांसाठी झालेल्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या मुदतीपर्यंत सोसायटीतील जागा बिनविरोध ठरल्या. उर्वरित १५ जागांसाठी मे राेजी मतदान झाले. थेट चुरशीच्या लढतीतून विक्रमी ९९ टक्के मतदान झाले. हजार ७६० मतदारांपैकी हजार ७२२ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. एकेका मतासाठी दोन्ही गटांच्या यंत्रणांनी आटोकाट प्रयत्न केला. परिणामी निकालाबाबत जिल्हावासीयांची उत्सुकता वाढली होती.
गुरुवारी सकाळी वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. सहकार विभागाचे ७५ कर्मचारी मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आले होते. प्रत्येक मतदारसंघासाठी एक याप्रमाणे १४ टेबलांवर एकाच वेळी मतमोजणीला सुरुवात झाली. दोन्ही गटांचे उमेदवार समर्थकांनी परिसरात एकच गर्दी केली होती. सेवा सोसायटी मतदारसंघातील जागांचे निकाल सकाळी नऊच्या सुमारास जाहीर करण्यात आले. अवघ्या तासाभरात हे निकाल लागले. यात विखे गटाला ५, तर थोरात गटाला जागा मिळाल्या. या निकालाने विखे गटात उत्साह संचारला. सेवा सोसायटीत बिनविरोध ठरलेल्या जागांमध्ये विखे गटाकडे थोरात गटाकडे जागा होत्या. भाजप आमदार मोनिका राजळे यांचे पती राजीव राजळे हे विखे गटाबरोबर असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, त्यांनी स्वत: आतापर्यंत कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. सेवा सोसायटी मतदारसंघातील मतमोजणीनंतर विखे गटाकडे ८, तर थोरात गटाकडे अवघ्या जागांचे बलाबल होते.
त्यानंतर चौदाही तालुक्यांतील मताचे एकत्रिकरण करून शेतीपूरक संस्था, बिगरशेती संस्था, महिला, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय भटक्या जमाती विमुक्त जाती मतदारसंघातील जागांसाठीची मतमोजणी झाली. या सात जागांपैकी तब्बल जागा मिळवत थोरात गटाने बँकेवरील सत्ता अबाधित ठेवण्यात यश मिळवले. राधाकृष्ण विखे यांच्या गटाला भटक्या जमाती मतदारसंघातील केवळ एक जागा जिंकता आली.
अभद्र युतीला मतदारांनी नाकारले
अाजपर्यंतच्या निवडणुकीत आम्ही किंवा जुन्या पिढीने राजकारण केले नव्हते. मात्र, यावेळी पहिल्यांदाच राजकारण पाहण्याची वेळ आली. विरोधी पक्षनेते भाजप-सेनेबरोबर गेल्याने कार्यकर्त्यांचे मन विचलित झाले. अभद्र युतीला मतदारांनीच नाकारले. बिनविरोधबाबत ऐनवेळी निरोप पाठवून विखे यांनी जमणार नसल्याचे कळवले. आम्हाला अंधारात ठेवून त्यांनी खेळी केली. मात्र, मतदारांनी आम्हाला साथ दिली.'' बाळासाहेब थोरात, आमदार.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चमत्कार
अटीतटीच्या झालेल्या लढतीत आम्हाला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले. एकत्र येण्याचा निर्णय उशिरा झाल्याचा फटका बसला. अन्यथा आणखी दोन ते तीन जागांची भर पडली असती. निवडणुकीत मिळालेले यश थोरात यांचे नसून राष्ट्रवादीचे आहे. थोरातांचे केवळ चार उमेदवार निवडून आले आहेत. अध्यक्ष उपाध्यक्षपदांच्या निवडणुकीत निश्चितपणे चमत्कार पहावयास मिळेल.'' शिवाजी कर्डिले, भाजप आमदार.
मतदारांचा कौल आम्हाला मान्य...
मतदारांनी दिलेला कौल आम्ही मान्य केला आहे. बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी निवडणुकीत मांडलेल्या भूमिकेला मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळेच आमच्या मतांमध्ये वाढ हाेऊन आमचे संचालकही वाढले. कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे हे यश मिळाले अाहे. भविष्यातही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अशीच सांघिक भूमिका घेऊन यापुढेही लढा सुरु ठेवू.'' राधाकृष्ण विखे, विरोधीपक्ष नेते.
बाप-लेकीची एन्ट्री
शेवगाव सोसायटी मतदारसंघातून माजी आमदार चंद्रशेखर घुले हे बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांची मुलगी चैताली काळे या गुरुवारी झालेल्या मतमोजणीत महिला प्रतिनिधी म्हणून संचालकपदी निवडून आल्या. बँकेच्या इतिहासात संचालक म्हणून बाप-लेक निवडून येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
"सहकार' सक्षम
जिल्हा बँकेची निवडणूक पहिल्यांदाच सहकार विभागाकडून घेण्यात आली. निवडणूक प्राधिकरण सहकार विभागाकडे निवडणूक सोपवण्यास साशंक होते. मात्र, जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिगंबर हौसारे त्यांच्या टीमने जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सर्व जबाबदाऱ्या सहकार कर्मचाऱ्यांनीच पार पाडल्या. त्यांना पोलिसांचे सहकार्य लाभले. विशेष म्हणजे निवडणूक प्रक्रियेबाबत एकही तक्रार यावेळी झाली नाही. मतदान प्रक्रियेसाठी ३००, तर मतमोजणीसाठी ७५ कर्मचारी अधिकाऱ्यांनी काम केले.
ताकद लावूनही मतदारांनी नाकारले
विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना आम्ही कधी
आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न केला नव्हता. मात्र, सध्याचे विरोधी पक्षनेत्यांना मुख्यमंत्र्यांचाच फोन येतो भाजप-सेनेला सोबत घेऊन पॅनेल बनवण्यास सांगितले जाते, हे दुर्दैवी आहे. एवढी ताकद लावूनही मतदारांनी त्यांना नाकारले. त्यांच्या पराभवापेक्षा निवडणुकीदरम्यान झालेल्या राजकारणाची खंत वाटते.''
मधुकर पिचड, माजीमंत्री, राष्ट्रवादी.
विजयी व पराभूत
- सेवा सोसायटी मतदारसंघ : - अकोले : सीतारामकोंडाजी गायकर ७२ (विजयी, थोरात गट), शिवाजी रामभाऊ धुमाळ १२ (पराभूत), संगमनेर: रामदासकाशिनाथ वाघ ११७ (विजयी, थोरात गट), रंगनाथ दशरथ खुळे १४ (पराभूत), श्रीरामपूर: जयंतमुरलीधर ससाणे ४१ (विजयी, विखे गट), इंद्रनाथ रावसाहेब थोरात २३ (पराभूत), नेवासे: यशवंतरावकंकरराव गडाख ११९ (विजयी, थोरात गट), भगवान एकनाथ गंगावणे १३ (पराभूत), जामखेड: जगन्नाथदेवराम राळेभात ३० (विजयी, विखे गट), रामचंद्र बापूराव राळेभात १८ (पराभूत), कर्जत: अंबादासशंकरराव पिसाळ ३८ (विजयी, विखे गट), विक्रम विजयराव देशमुख ३४ (पराभूत), श्रीगोंदे: दत्तात्रेयभाऊसाहेब पानसरे ७३ (विजयी, विखे गट), प्रेमराज दगडू भोईटे ३५ (पराभूत), कोपरगाव: बिपीनशंकरराव कोल्हे ७३ (विजयी, विखे गट), अशोक शंकरराव काळे ४० (पराभूत) - बिनविरोध - नगर: शिवाजीभानुदास कर्डिले (विखे गट), राहाता: अण्णासाहेबसारंगधर म्हस्के (विखे गट), पारनेर: उदयगुलाबराव शेळके (थोरात गट), शेवगाव: चंद्रशेखरमारुतराव घुले (थोरात गट), पाथर्डी: राजीवअप्पासाहेब राजळे (गट अनिश्चित), अरुण बाबुराव तनपुरे (विखे गट).
- शेतीपूरक संस्था मतदारसंघ : - रावसाहेबमारुती शेळके ७१६ (विजयी, थोरात गट), दादासाहेब अर्जुन सोनमाळी ३३९ (पराभूत)
- बिगरशेती संस्था मतदारसंघ : - अरुणबलभीम जगताप ८८० (विजयी, थोरात गट), सबाजी महादू गायकवाड ४६७ (पराभूत)
- अनुसूचित जाती - जमाती मतदारसंघ : - वैभवमधुकर पिचड २०३४ (विजयी, थोरात गट), अशोक यशवंतराव भांगरे १६६८ (पराभूत)
- इतर मागासवर्गीय मतदारसंघ : - सुरेशमोहिनीराज करपे १८३० (विजयी, विखे गट), अनिल माधव शिरसाठ १७३४ (विजयी, थोरात)
- विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघ : बाजीरावखंडूजी खेमनर २२६१ (विजयी, थोरात गट), सुभाष रावबा गिते १३४६ (पराभूत)
- महिला प्रतिनिधी मतदारसंघ : - चैतालीआशुतोष काळे २१३७, मिनाक्षी सुरेश साळुंके १६७९ (दोन्ही विजयी, थोरात गट), सुरेखा भानुदास कोतकर १५८१ प्रियंका राहुल शिंदे १३५५ (दोन्ही पराभूत).