आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Bank Elections: All Candidates Engage To Making Panel

जिल्हा बँक निवडणूक: पॅनल जुळवाजुळवीला आला वेग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी पॅनेल जुळवाजुळवीसाठी वेगवान घडामोडी घडत आहेत. रविवारी सकाळी भाजपची बैठक झाली, तर राष्ट्रवादीची रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नगर दौ-याने हालचालींना वेग आला अाहे. अर्ज भरण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. पहिल्या दिवशीच एकही अर्ज दाखल झाल्याने सोमवारपासून जिल्हा उपनिबंधक कार्यालयात गर्दी होणार आहे.

पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी सकाळी भाजपच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक झाली. सुरुवातीला सर्वच जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली. आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार बबनराव पाचपुते प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. येत्या दोन-तीन दिवसांत बोलणी सुरू ठेवून इतर पॅनेलसोबत जाण्याचा निर्णय झालाच, तर अर्ज माघारी घेण्याची संधी आहे. त्यामुळे सर्वच जागांवर अर्ज भरण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीसह काँग्रेसअंतर्गत थोरात गटाशी बोलणी सुरू ठेवण्यात आली आहे.

एसटी कामगार संघटनेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने शहरात आलेल्या शरद पवार यांनी जिल्हा बँक निवडणुकीचा आढावा घेतला. माजी मंत्री मधुकर पिचड, जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग, आमदार अरुण जगताप यांच्यासह प्रमुख पदाधिका-यांशी त्यांनी सल्लामसलत केली. आमदार जगताप यांच्या घरी भाजपचे आमदार कर्डिले यांच्याशीही त्यांची बोलणी झाली. दरम्यान, सायंकाळी सातच्या सुमारास ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या निवासस्थानी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती. भाजपला सोबत घेण्याबाबत वाटाघाटी करण्यासाठी आमदार कर्डिले यांनाही या बैठकीसाठी पाचारण करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीतील सूत्रांनी दिली.

प्रक्रियेला प्रारंभ
२१जागांच्या निवडणूक प्रक्रियेला एप्रिलपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ८५ उमेदवारांनी २२७ अर्ज नेले. यात दोन्ही खासदार सदाशिव लोखंडे, दिलीप गांधी यांच्यासह आमदार कर्डिले, वैभव पिचड, राहुल जगताप, चंद्रशेखर घुले, राजीव राजळे, नरेंद्र घुले यांचा समावेश आहे. एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येणार असल्याने तीन दिवस जिल्हा उपनिबंधक कार्यालयात गर्दी होणार आहे.