आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Bank Elections: MP Lokhande, Gadakh, Jagtap Filed Nomination Form

जिल्हा बँक निवडणूक: खासदार लोखंडे, गडाख, जगताप यांचे अर्ज; आज शेवटचा दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा बँकेसाठी मंगळवारी ९२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. बुधवारी (८ एप्रिल) अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून दुपारी तीनपर्यंत अर्ज दाखल करता येतील. या निवडणुकीत काँग्रेस अंतर्गत राधाकृष्ण विखे बाळासाहेब थोरात गटातच प्रमुख लढत होणार आहे.
मंगळवारी ७० उमेदवारांनी ९२ उमेदवारी अर्ज भरले. त्यात खासदार सदाशिव लोखंडे, माजी खासदार यशवंतराव गडाख, आमदार राहुल जगताप यांचा समावेश आहे. प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघासाठी अकोले तालुक्यातून शिवाजी रामभाऊ धुमाळ, विठ्ठल शंकर चासकर, प्रकाश दत्तात्रय हासे यांचे अर्ज दाखल झाले.
संगमनेर तालुक्यातून विश्वनाथ शिंदे यांचा अर्ज आला. श्रीरामपूर तालुक्यातून इंद्रनाथ रावसाहेब थोरात यांनी अर्ज दाखल केला. नेवासे तालुक्यातून यशवंतराव कंकरराव गडाख, शंकरराव यशवंतराव गडाख, दादासाहेब दामोदर मुरकुटे, भगवान एकनाथ गंगावणे यांचे अर्ज आले. पारनेर तालुक्यातून मारुती भिकाजी रेपाळे यांचा अर्ज आला. जामखेड तालुक्यातून अमोल जगन्नाथ राळेभात, रामचंद्र बापूराव राळेभात यांनी अर्ज भरला. कर्जत तालुक्यातून सुरेश भागवत साळुंके अंबादास शंकर पिसाळ यांचे अर्ज आले. पाथर्डी तालुक्यातून दादासाहेब गोपीनाथ घोरपडे यांचा अर्ज आला. श्रीगाेंदे तालुक्यातून कुंडलिक रामराव जगताप, राहुल कुंडलिक जगताप, घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब गिरमकर, प्रेमराज दगडू भोईटे यांनी अर्ज दाखल केले. काेपरगाव तालुक्यातून अशोक शंकरराव काळे, मारुती कारभारी आगवण यांनी अर्ज भरले. राहुरी तालुक्यातून सुभाष शिरसाठ यांचा अर्ज आला.शेतीपूरक संस्था मतदारसंघातून यशवंतराव गडाख, रावसाहेब म्हस्के, रावसाहेब शेळके, राहुल जगताप, अशोक भांगरे, आशुतोष काळे, सिद्धेश्वर देशमुख, दादासाहेब सोनमाळी, अशोक काळे, प्रेमराज भोईटे यांनी अर्ज दाखल झाले.

बिगर शेती संस्था मतदारसंघातून लक्ष्मण नरसय्या बुरा, रावसाहेब नाथाजी म्हस्के, अरुण बलभीम जगताप, तुकाराम आप्पाजी दरेकर, दिलीप पांडुरंग ठुबे, घनश्याम प्रताप शेलार, अशोक ज्ञानोबा थोरे, सबाजी महादू गायकवाड, संजय रामराव रोहमारे, अशोक नामदेव गर्जे, ज्ञानदेव दगडू मांजरे, संपत बन्सीभाऊ म्हस्के, अरुण सिमाराम होळकर, विठ्ठल शंकरराव वासकर यांचे अर्ज आले.