आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Bank Elections: Upset Waves Hit Nationalist Congress Party ?

जिल्हा बँक निवडणूक: नाराजीचा फटका राष्ट्रवादीला बसणार?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर कार्यकर्ते कामाला लागले असून मतदारांशी संपर्क वाढवला जात आहे. राष्ट्रवादी आणि थोरात गटाची बाजू जड ठरेल, अशी चर्चा असली तरी राष्ट्रवादीतील काही नाराज कार्यकर्त्यांची वाढती फौज छुप्या पद्धतीने विखेंच्या गोटात सामील झाली, तर त्याचा फटका या गटाला बसू शकतो. त्यामुळे सत्तेची गणिते आखताना नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करायला सुरुवात झाली आहे.

जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत शुक्रवारी अर्जमाघारीची अंतिम मुदत होती. आता लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून कोणाची सरशी होईल, याची चर्चा जिल्हाभरात सुरू झाली आहे. जिल्हा बँकेत राजकारण आणता निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दिग्गजांनी प्रयत्न केले. परंतु तब्बल २२२ अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे त्याचवेळी मावळली होती.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात मधुकर पिचड यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. सात राखीव जागांपैकी तीन थोरात, तीन राष्ट्रवादी एक विखे यांना देण्याचे गणित जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर आखले गेले. यावेळी तीनही प्रमुख नेते उपस्थित होते. त्यानंतर कार्यकर्ते अर्ज माघारीसाठी गेले. राष्ट्रवादीच्या वाट्याची ओबीसीची जागा विखे यांना देण्याचे ठरले होते. त्यामुळे माजी अध्यक्ष पांडुरंग अभंग सिद्धार्थ मुरकुटे यांनी माघार घेतली. पण विखे यांचा घोळ लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीची चांगलीच धावपळ उडाली. त्यामुळे या जागेसाठी राष्ट्रवादीकडून अनिल शिरसाठ यांचा अर्ज ठेवण्यात आला.

थोरात-राष्ट्रवादीची सत्तेच्या दिशेने वाटचाल होण्याची शक्यता वर्तवली जात अाहे. पण राष्ट्रवादीतील नाराजांची फळी छुप्या पद्धतीने विखेंच्या गोटात सामील होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने स्वतंत्र पनेल करावा, अशी निष्ठावंत कार्यकर्त्यांची मागणी होती. परंतु स्वतंत्र पनेल करता घराणेशाही पुढे करण्यावरही काही सदस्य नाराज आहेत.

नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यासाठी कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीला अंतर्गत कुरघोड्यांचा सामना करावा लागला, तर विखेंचे पारडेही प्रसंगी जड होऊ शकते. या सर्व शक्यता पडताळून सत्ताधारी विरोधी गटाकडून संयमाने रणनिती आखली जात आहे.

कोणीच नाराज नाही
जिल्हाबँकेसाठी मागील निवडणुकीप्रमाणे जुना पॅटर्न राबवला आहे. कोणीही नाराज असल्याची माहिती मला समजली नाही. पिचड नांदेडला गेले आहेत. ते आल्यानंतर आम्ही उद्या एकत्र चर्चा करू. बँकेत चांगला कारभार करून राज्यात क्रमांक एकवर बँक आणली आहे. तसेच काम पुढेही करायचे आहे, सर्वांनी समजूतदारपणाची भूमिका घेऊन काम करावे.'' पांडुरंगअभंग, माजी अध्यक्ष, जिल्हा बँक.