नगर - जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणूक काळात विद्यार्थ्यांकडे थोडेही दुर्लक्ष होणार नाही याची काळजी संबंधित शिक्षकांनी घ्यावी, असे जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड यांनी सांगितले.
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक पुरस्कारांचे वितरण रविवारी गुंड यांच्या हस्ते झाले. इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशनतर्फे लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शिक्षणाधिकारी अशोक कडूस, प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर मोहोळकर, जिल्हाध्यक्ष भागवत लेंडे, कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, अरुण आनंदकर, पी. एस. निकम, शाहुराव घुटे, ज्ञानदेव खराडे, सुभाष चाटे, गजानन गायकवाड, आबा लोंढे, अशोक गिरी, रामभाऊ गवळी, एकनाथ व्यवहारे आदी उपस्थित होते.
गुंड म्हणाल्या, शिक्षक बँकेच्या निवडणूक काळात विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी शिक्षकांनी घ्यावी. राजकारण दहा ते पाच या वेळेत करू नये. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची जबाबदारी आपल्यावर आहे.विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम शिक्षक करतात. हे आधुनिकतेचे युग असल्याने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उज्वल पिढी घडवता येईल. विद्यार्थी घडवताना त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी स्पर्धांचे आयोजन केले जाते, ही बाब कौतुकास्पद आहे, असेही गुंड म्हणाल्या. राऊत म्हणाले, राजकारणी शिक्षक होऊ शकत नाही, पण शिक्षक राजकारणी होऊ शकतो. शिक्षकांनी राजकारण करत असताना आपला मूळ गाभा विसरू नये, असे त्यांनी सांगितले.
पुरस्कारार्थी शिक्षक
लहू गांगड, सपना गुरव, सदाशिव बंदसोडे, दीपाली रेपाळ, संगीता पाटोळे, सोमनाथ मंडाळकर, सुनीता इंगळे, नाना राजबोज, वेरोनिका आैसरमल, अशोक रहाटे, सुरेखा पाचारणे, रोहिदास ससाणे, संगीता जेजूरकर, रमेश राऊत, छाया राजपूत, राजू साळवे, आशा कसबे, दीपक साळवे, सुषमा गायकवाड.
शिक्षकांना प्रोत्साहन
^महात्मा फुले दांपत्यांचे विचार पुढे जाण्यासाठी जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कारांचे वितरण केले जाते. तळागाळात तांड्यात विद्यार्थी घडवण्याचे काम अनेत शिक्षक करत आहेत. अशा शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी असोसिएशन सध्या काम करते आहे.'' भागवत लेंडे, जिल्हाध्यक्ष,इब्टा.