आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदी विरोधात जिल्हा काँग्रेसच्या शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर :  नोटबंदी विरोधात जिल्हा काँग्रेसच्या शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. नोटबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला असल्याचे नमूद करून आंदोलकांनी निदर्शने केली. 
 
नोटबंदी विरोधात मार्केट यार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. नोटबंदी विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली. कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर घोषणाबाजी करीत प्रवेशद्वारासमोच ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले.
 
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भाषणे करून नोटबंदीच्या विरोधात भावना व्यक्त केल्या. मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. नोटबंदीच्या ५० दिवसांत ११५ निर्दोष नागरिकांचा मृत्यू, रिझर्व्ह बँकेने १३५ वेळा नियम बदलले, सरकार आणि रिझर्व्ह बँकेने लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला, नोटबंदी हा कृषी अर्थव्यवस्थेवर मोठा प्रहार आहे, शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या जिल्हा सहकारी बँका आणि कृषी क्रेडिट सोसायट्यांवर निर्बंध घालून कृषी अर्थपुरवठा थांबवला आदी प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले. 
 
यावेळी माजी खासदार दादापाटील शेळके, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सदस्य बाळासाहेब हराळ, संपत म्हस्के, शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, बाळासाहेब भुजबळ, कांचन मांढरे, सविता मोरे, नानासाहेब पवार, सचिन गुजर, करम ससाणे, सुनील भिंगारे आदी उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...