आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • District Council Chairman,latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जि. प. कर्मचा-याची कन्या झाली जिल्हा परिषदेची अध्यक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील प्रभाकर माधवराव हारदे यांनी तब्बल ३५ वर्षे नगर जिल्हा परिषदेत सेवा केली. त्यांची कन्याच आता "मिनी मंत्रालय' समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेची अध्यक्ष झाली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी रविवारी कर्जत तालुक्यातील मंजूषा गुंड यांची बिनविरोध निवड झाली.
त्यांचे वडील प्रभाकर हारदे हे मूळचे राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील रहिवासी. त्यांना अंजूषा व मंजूषा या दोन जुळ्या मुली आणि प्रफुल्ल व मिलिंद ही दोन मुले आहेत. जिल्हा परिषदेत ते १९६८ मध्ये रुजू झाले. ३५ वर्षे सेवा केल्यानंतर ते २००४ मध्ये सेवानिवृत्त झाले. जिल्हा परिषदेत असताना अध्यक्षांचे कामकाज त्यांनी जवळून पाहिले. याच जिल्हा परिषदेत आपली कन्या एकेदिवशी अध्यक्ष होईल, असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते. हा रविवार त्यांच्यासाठी आनंदाचा व अभिमानाचा दिवस ठरला. त्यांची कन्या मंजूषाची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
हारदे यांच्याबरोबर काम करणारे शिवाजी शिंदे, सुभाष कराळे आजही जिल्हा परिषदेत कार्यरत आहेत. त्यांनाही या निवडीने विशेष आनंद झाला. सर्वसामान्य घरातील मित्राची मुलगी मोठ्या पदावर पोहोचली, याचा त्यांनाही अभिमान आहे. मंजूषा यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. उच्च शिक्षण त्यांनी नगर येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालयात पूर्ण केले. त्या बीएसस्सी, बीपीएड आहेत. सन २००० मध्ये त्यांचा कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील राजेंद्र गुंड यांच्याशी विवाह झाला. सासरे बापूसाहेब गुंड हे जगदंबा शिक्षक प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष असून त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम केले आहे. पती राजेंद्र हेही जिल्हा परिषद सदस्य होते. आता मंजूषा यांना अध्यक्ष म्हणून जनसेवा करण्याची संधी मिळाली आहे.
जि. प. सांभाळायला मंजूषा सक्षम
मंजूषाला अध्यक्षपद सहजासहजी मिळेल याची खात्री नव्हती. अध्यक्षपद आेबीसी महिलेसाठी राखीव झाल्यानंतर आम्ही प्रयत्न सुरू केले. काहींनी आम्हाला पद मिळू नये, यासाठी प्रयत्न केले. पण पक्षश्रेष्ठींनी आमच्यावर विश्वास टाकला. तिच्या कामकाजात पतीराज आडवे येणार नाही. ती घराचा कारभार चांगल्या प्रकारे सांभाळत असून जिल्ह्याचाही कारभार ती निश्चितच सक्षमपणे पाहील.''राजेंद्र गुंड, अध्यक्षांचे पती
माझ्या कन्येचा मला सार्थ अभिमान
जिल्हा परिषदेत काम करताना मला दोनदा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून पुरस्कार मिळाला. जिथे मी अनेक वर्षे काम केले, त्याच जिल्हा परिषदेत माझ्या लेकीला अध्यक्षपदाची संधी मिळाली, याचा मला सार्थ अभिमान आहे. तिच्या माध्यमातून जिल्ह्यातील विकासकामांना गती मिळावी, ही अपेक्षा...'' प्रभाकर हारदे, वडील