आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेसाठी आज जिल्ह्यात मतदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गुरूवारी (१६ फेब्रुवारी) जिल्ह्यात मतदान होत आहे. जिल्हा परिषदेसाठी ३०५, तर पंचायत समिती निवडणुकीसाठी ५४१ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद होणार आहे. गुरुवारी सकाळी साडेसातपासून मतदान सुरू होईल. बुधवारी सकाळी मतदान केंद्रावर यंत्रे रवाना झाली. मतदान प्रक्रियेसाठी १६ हजार २१२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. या निवडणुकीचा प्रचार मंगळवारी थांबला. जिल्हा परिषदेच्या ७३ गटांत ३०५ उमेदवार तर पंचायत समितीच्या १४६ गणांत ५४१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण हजार ९४६ मतदान केंद्रावर होत असलेल्या मतदान प्रक्रियेसाठी हजार ९४६ मतदान केंद्रप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान चालेल. जिल्ह्यातील अतिसंवदेनशील आणि संवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 
 
जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान साहित्य घेऊन निवडणूक कर्मचारी अधिकारी बुधवारी एसटी बसगाड्यांतून संबंधित मतदान केंद्रांवर रवाना झाले. 
निवडणूक 
 
बातम्या आणखी आहेत...