आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज ठरणार ८४६ उमेदवारांचे भवितव्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक मातब्बरांनी प्रतिष्ठेची केली असून विजयासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आटापिटा केला. गुरुवारी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात होणार असल्याने मतदान केंद्र परिसरात मांडव टाकण्यासाठीही कार्यकर्त्यांची धावपळ पहायला मिळाली. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप शिवसेनेने सोयीनुसार आघाडी, महाआघाडी करून उमेदवार रिंगणात उतरवले. जेथे चर्चा होऊनही सहमती होऊ शकली नाही, तेथे असहमतीने स्वबळाचा निर्णय घेण्यात आला. 
 
जिल्हा परिषदेचे ७३ गट १४६ गणातील ८४६ जागांसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली अाहे. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने भाजपला भुईसपाट करण्याची रणनिती आखली आहे. अनेक दिग्गज रिंगणात असल्याने काही लढती लक्षवेधी आहेत. त्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ७३ गटांच्या जागांसाठी ८९८ तर १४६ गणांसाठी हजार ५८८ असे एकूण हजार ४०० अर्ज दाखल झाले होते. त्यानंतर झालेल्या छाननीत गटासाठी ८६३ गणासाठी हजार ५२७ अर्ज मान्य करण्यात आले. त्यानंतर अपक्ष आघाड्यांच्या उमेदवारांना अर्ज माघारीसाठी मोठा खटाटोप करण्यात आला. अखेर गटासाठी अवघे २८५ उमेदवार रिंगणात उरले. एका गटात सुमारे चार ते पाच उमेदवार रिंगणात आहेत. बहुतेक ठिकाणी दिग्गजांनी माघार घेतली. गुरुवारी मतदान असल्याने मागील चार दिवसांपासून प्रचार शिगेला पोहोचला होता. मटणाची मेजवानी अन् दारूचा डोस देऊन काहींनी कार्यकर्त्यांना जोमात आणले. नोटबंदीनंतर प्रचारासाठी अन् कार्यकर्त्यांच्या मौज, मजेसाठी पैशांचा चुराडा करण्यात आला, हे निवडणूक वैशिष्ट्य आहे. 

पांगरमल येथे दारूच्या सेवनाने सहा बळी गेल्याची घटना घडली. या घटनेमुळे जिल्हाभरात दारूच्या पार्ट्यांवर नाराजीचा सूर उमटला. दरम्यान, जिल्ह्यातील लक्षवेधी लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. बारागाव नांदूर गटात राष्ट्रवादीचे शिवाजी गाडे विरुद्ध काँग्रेसचे प्रभाकर गाडे, भाजपचे सत्यवान पवार, वांबोरी गटात काँग्रेसच्या शशिकला पाटील विरुद्ध राष्ट्रवादीच्या संगीता जवरे, कासार पिंपळगाव गटात राष्ट्रवादीचे शिवशंकर राजळे विरुद्ध राहुल राजळे, भालगाव गटात प्रभावती ढोकणे विरुद्ध भाजपचे संजय बडे, राजूर गटात सुनीता भांगरे विरुद्ध पुष्पा निगळे, धामणगाव गटात कैलास वाकचौरे िवरुद्ध अनिता मोरे शांताराम वाळुंज, कुकाणे गटात राजश्री लंघे, विरुद्ध मीरा ढोकणे, खरवंडी गटात सुनील गडाख विरुद्ध दत्ता लोहकरे, लाडजळगाव गटात हर्षदा काकडे विरुद्ध अंजली काकडे राजेंद्र दोंडे, दरेवाडी गटात संदेश कार्ले विरुद्ध अनिल करांडे, देहरे गटात प्रताप शेळके, सुभाष झिने, जालिंदर कदम अशी तिरंग लढत, तर वाळकी गटात अनिता हराळ विरुद्ध स्वाती बोठे या लढती रंगतदार होतील. मातब्बर उमेदवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली अाहे. 

एक हाती सत्ता येणे थोडे अवघडच... 
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या ४० प्लस धोरणाला सुरूंग लावण्यासाठी राजकीय मोर्चेबांधणी केली. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आगामी अध्यक्ष आमचाच असेल, असा दावा करत आहेत. भाजपलाही सत्तेचे डोहाळे लागले आहेत. परंतु सद्यस्थिती पाहता कोणत्याही पक्षाला एकहाती सत्ता मिळवणे अवघड आहे. 

भाजपकडून शर्थीचे प्रयत्न, पण.. 
केंद्रात आणि राज्यात भाजप-युतीचे सरकार अस्तित्वात आले. त्यामुळे आता आघाडीकडून जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचा चंग बांधला आहे. पण मातब्बरांनी आगामी विधानसभेची समिकरणे जुळवून स्थानिक पातळीवर पक्ष बाजूला ठेवून सोयीची भूमिका घेतल्याचे चित्र आहे. याचा फटका भाजपला बसू शकतो. 
 
बातम्या आणखी आहेत...